मोठी गुड न्यूज! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

Gold-Silver Rate Today | मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या भावात प्रचंड तेजी दिसून आली. सोनं पहिल्यांदाच 70 हजारांच्या घरात पोहोचलं. चांदीचे भावही मागच्या महिन्यात गगनाला भिडले. सोन्याचे भाव अजूनही तेजीत आहेत. मात्र आज (3 एप्रिल) काही अंशी दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याने ग्राहकांना थोडा फार दिलासा दिला आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस सोनं 2000 रुपयांनी महागलं. 29 मार्च रोजी सोन्याने पुन्हा उसळी घेतली. त्यात 1300 रुपयांची विक्रमी वाढ झाली. तर, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी सोनं 930 रुपयांनी वधारलं. तर 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची घसरण झाली.

सोने-चांदीच्या किंमती

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 63,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं काही अंशी स्वस्त झालं असलं तरी चांदीचे भाव अजूनही सुसाट आहेत.

मागच्या (Gold-Silver Rate Today) महिन्यात 28 आणि 29 मार्च रोजी चांदीत सलग 300 रुपयांची वाढ झाली. 30 मार्च रोजी किंमती 200 रुपयांनी वधारल्या. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी भाव 600 रुपयांनी वधारले. तर 2 एप्रिल रोजी 400 रुपयांनी किंमती वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 79,000 रुपये आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

गुडरिटर्न्सनुसार (Gold-Silver Rate Today) .24 कॅरेट सोने 68,961 रुपये, 23 कॅरेट 68,685 रुपये, 22 कॅरेट सोने 63,168 रुपये झाले.18 कॅरेट 51,721 रुपये, 14 कॅरेट सोने 40,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलं आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today April 3

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”

“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई