आयपीएल हंगामात 21 वर्षीय मयंक यादवची हवा, अवघ्या 2 सामन्यात लावले सर्वांना वेड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Purple Cap List l यंदाच्या वार्षिक IPL हंगाम काही खास आहे. या हंगामात प्रत्येक खेळाडू नवनवीन विक्रम करताना दिसत आहेत. अशातच या हंमागात पर्पल कॅपची स्पर्धा जोरदार सुरु आहे. काल झालेल्या लखनौ आणि बंगळुरू या सामन्यात मयंक यादवने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने पर्पल कॅपच्या शर्यतीतही आपले स्थान निर्माण केले आहे.

अवघ्या 2 सामन्यांत घेतले 6 बळी :

21 वर्षांच्या मयंक यादवने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील अवघ्या 2 सामन्यात सर्वांनाच वेड लावले आहे. मयंक यादव वेगवान गोलंदाजीसोबत सातत्याने विकेट घेण्यातही यशस्वी आहे. आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या मयंक यादवने अप्रतिम गोलंदाजी करत पर्पल कॅपच्या शर्यतीत दमदार एंट्री केली आहे.

मयंकने IPL 2024 मध्ये आतापर्यंत 41 धावांत 6 बळी घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत त्याने दुसरे स्थान निश्चित केले आहे. तसेच काल मयंक यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 4 षटके टाकली आणि अवघ्या 14 धावांत 3 बळी घेतले. मयंकने रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीनसारख्या स्टार फलंदाजांना बाद केले आहे.

IPL 2024 Purple Cap List l मयंक चेन्नईच्या मुस्तफिजुर रहमानला मागे टाकणार? :

IPL 2024 च्या हंमागात चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मुस्तफिजुर रहमानने आतापर्यंत 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. पण मयंक यादव अवघ्या 2 सामन्यात त्याच्या अगदी जवळ आला आहे, त्यामुळे पर्पल कॅपच्या शर्यतीत तो मुस्तफिजुर रहमानसाठी मोठा धोका बनला आहे.

मुस्तफिजुर रहमान – 3 सामन्यात 7 विकेट्स
मयंक यादव – 2 सामन्यात 6 विकेट्स
युझवेंद्र चहल – 3 सामन्यात 6 विकेट्स
मोहित शर्मा – 3 सामन्यात 6 विकेट्स
खलील अहमद – 3 सामन्यांत 5 बळी

News Title – Mayank Yadav IPL 2024 Purple Cap 

महत्वाच्या बातम्या –

OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतोय तब्बल 6 हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स

आकर्षक फीचर्ससह बजाज कंपनीची Pulsar N250 बाईक लाँच; किंमत किती असणार?

मोठी गुड न्यूज! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

पुण्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार!

किंग कोहलीला हरवून केएल राहुलच्या संघाची दणक्यात टॉप-4 मध्ये एंट्री; पाहा संपूर्ण पॉईंट टेबल