घर बांधण्याचं स्वप्न महागणार? सिमेंटच्या किंमती ‘तब्बल’ एवढ्या रुपयांनी वाढणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Cement Companies Increased Prices l छोटस का होईना पण स्वतःच घर असणं हे प्रत्येकाचच स्वप्न असत. मात्र वाढत्या महागाईमुळे काही नागरिकांचं स्वप्न हे अधुरच राहत. अशातच जर तुम्ही तुमचे हे स्वप्न सत्यात बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला निराशेचा सामना करावा लागू शकतो. कारण आगामी काळात घर बांधणे महाग होणार आहे.

सिमेंटच्या किंमती 10 ते 15 रुपयांनी वाढू शकतात :

येत्या काही दिवसांत देशातील सिमेंटच्या किमती वाढू शकतात असे एका अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, निवडणुकांमुळे सिमेंटच्या मागणीत मंदी असली तरी या महिन्यापासून सिमेंटच्या किमती वाढू शकतात. या महिन्यात सिमेंट कंपन्या सिमेंटच्या दरात सरासरी 10 ते 15 रुपयांनी वाढ करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत सिमेंटचे भाव कमी होते आणि त्याचा फायदा नागरिकांना होत होता. तसेच सिमेंटचे भाव सलग ५ महिने घसरत होते. मार्च तिमाहीतील सरासरी सिमेंटच्या किमती डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 5-6 टक्क्यांनी कमी होत्या. त्याचा सर्वाधिक फायदा पूर्व आणि दक्षिण भारतातील बाजारपेठांमध्ये दिसून आला आहे. कारण त्या दोन बाजारपेठांमध्ये सिमेंटच्या किमती सर्वाधिक कमी झाल्या आहेत.

Cement Companies Increased Prices l तब्बल एवढ्या रुपयांनी सिमेंटच्या किंमती वाढू शकतात :

मार्च तिमाहीत सिमेंटच्या मागणीत आणि किमतीत वाढ दिसून आली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सिमेंटची मागणी वार्षिक आधारावर 6 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याचा परिणाम भावावर झाला नाही. कंपन्यांनी आता त्याची भरपाई करण्याची तयारी केली आहे.

अहवालानुसार, दक्षिण भारतीय बाजारपेठेत सिमेंटच्या किमती सर्वाधिक वाढू शकतात. या महिन्यात प्रति बॅग 30 ते 50 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य भारतातील बाजारपेठेत प्रति बॅग 15-20 रुपये, उत्तर भारतात 10-15 रुपये, पश्चिम भारतात 20-25 रुपये आणि पूर्व भारतात 30 रुपयांची वाढ होऊ शकते.

News Title – Cement Companies Increased Prices

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल हंगामात 21 वर्षीय मयंक यादवची हवा, अवघ्या 2 सामन्यात लावले सर्वांना वेड

OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतोय तब्बल 6 हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स

आकर्षक फीचर्ससह बजाज कंपनीची Pulsar N250 बाईक लाँच; किंमत किती असणार?

मोठी गुड न्यूज! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

पुण्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार!