लोकसभा निवडणुकीबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

Loksabha Election 2024 | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी (2 एप्रिल) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यामुळे निवडणुकीत रिपाइं पंकजा यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या. यावर आज आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी आठवले यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. एकंदरीत लोकसभा निवडणूक, उमेदवारी अन् महायुतीचं जागावाटप यासंदर्भात आठवले स्पष्टपणे बोलले. त्यांनी पंकजा मुंडे यांना पाठिंबाही दर्शवला आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

आरपीआयच्या कार्यालयात पंकजा मुंडे आणि आठवले यांची भेट झाली होती. यावर ते म्हणाले की, पंकजाताई मला भेटायला आल्या होत्या. तुमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा हवा असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांच्या वडिलांचे आणि आमचे चांगले संबंध होते. पंकजाताईंना तिकीट मिळाल्यामुळे त्या खुश आहेत. तुम्ही दिल्लीत आलं पाहिजे, असं मी मागे म्हटलं होतं.

बीडमध्ये त्यांनी चांगलं काम केलंय. त्यामुळे या निवडणुकीत त्या नक्कीच जिंकतील. त्यांना आमचा पाठिंबा निश्चितपणे राहील. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी रिपाइं लोकसभा (Loksabha Election 2024) लढणार की नाही, याबाबतही मोठं भाष्य केलं. तसंच बीडमध्ये केज मतदारसंघ आहे, तो रिपाइंला द्यावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

रिपाइंला एकही जागा नाही मिळाली

या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) रिपाइंने दोन जागांची मगणी केली होती. मात्र त्यांना एकही जागा देण्यात आली नाही. यावर ते म्हणाले की, माझी सीट 2026 मध्ये घोषित होणार आहे. माझी सीट ही राज्यसभेची आहे. दक्षिण भारतात भाजपची ताकद कमी आहे. त्यामुळे आम्ही तिकडे आमचे उमेदवार देणार आहोत. त्यात आसाम मध्ये 5, तेलंगणा मध्ये 2 तर आंध्रमध्ये 1 सीट उभी करतोय.

यासोबतच मणिपूरमध्ये 1 सीट, झारखंड मध्ये 1-2 लोकसभा लढणार आहोत, असं रामदास आठवले म्हणालेत. ओरिसामध्ये 8-9 विधानसभेच्या जागा लढणार आहोत. त्या जागा आम्ही जिंकू सुद्धा… बाकी ठिकाणी आमचा NDA ला पाठिंबा असणार असल्याचं आठवले म्हणाले.

News Title – Ramdas Athawale On Loksabha Election 2024   

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी गुड न्यूज! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

पुण्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार!

किंग कोहलीला हरवून केएल राहुलच्या संघाची दणक्यात टॉप-4 मध्ये एंट्री; पाहा संपूर्ण पॉईंट टेबल

कमाईची सुवर्णसंधी; भारती एअरटेल ग्रुपचा IPO आज उघडणार

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर