राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागांना बसणार फटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | राज्यात ऊन प्रचंड वाढलं आहे. राज्यासह देशातही काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस असं वातावरण दिसून येतंय. राज्यात विदर्भ आणि मराठवाडा येथे तापमान वाढलं आहे. विदर्भात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहील. 11 जिल्ह्यात असं हवामान राहील.

अकोला, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात 4 एप्रिलला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढणार आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथेही उकाडा वाढेल. विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे 5 एप्रिलला व यवतमाळला 4 एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

‘या’ भागांना बसणार अवकाळीचा फटका

यानंतर (Weather Update ) आठवड्याच्या शेवटी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने 6 ते 8 एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि 7 ते 8 एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांमध्ये एक द्रोणीय रेषा दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भ पर्यंत असून जी कर्नाटक व मराठवाड्यावरून जाते. यामुळे पुढील काही दिवस राज्यात तापमान कोरडं राहील. यानंतर मात्र, ढगाळ वातावरणसह अवकाळी पाऊस पडू शकतो.

‘या’ भागांत उष्णतेची लाट येणार

येत्या दोन-तीन दिवसांत मराठवाड्यात दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने तापमान वाढ होणार आहे. यामुळे रात्रीही उकाडा जाणवणार आहे.काल विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पारा हा 40 अंशांवर पोहचला होता.

पुण्यात हवामान कसं राहील?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे (Weather Update) व परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर वातावरण कोरडे राहील. येथे 39.8 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या कीमान तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी देखील 7 ते 8 एप्रिलदरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे.

News Title-  Weather Update in Maharashtra State

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”

“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई