15 मिनिटांत टॅनिंग निघेल, करा ‘हा’ उपाय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Skin Care Tips | देशासह राज्यातही कडक उन्हाच्या झळा लागत आहेत. तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात तर प्रचंड उन्हाचे चटके लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आव्हान करण्यात आलंय.

ऊन वाढत असल्याने आरोग्याचीही अधिक काळजी घ्यावी लागले. भरपूर पाणी पिणे, थेट सूर्यप्रकाशपासून संपर्क टाळणे, यासोबतच चेहऱ्याची देखील काळजी घेणं आवश्यक असतं. या काळात सन टॅनिंग, सन बर्न व्हायचे प्रकार अधिक घडतात. दुपारी उन्हातून थोडा वेळ जरी आलं की, चेहरा काळपट होतो.

काही जणांना तर त्वचेच्या अनेक समस्या जाणवतात. अनेकांच्या चेहऱ्यावर लालसरपणा आणि सूज येण्याची समस्या सुरू होते. याला सनबर्न म्हणतात.त्वचेवर तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा आतून खराब होऊ लागते आणि त्वचा पिगमेंटेशन होते. याशिवाय चेहऱ्यावर सूर्यप्रकाशामुळे अनेक समस्या निर्माण होतात ज्यांचे परिणाम दीर्घकाळ दिसून येतात. हे सर्व टाळायचं असेल तर तुम्हाला काही सोपे उपाय या लेखात सांगितले आहेत.

चेहऱ्यावर दही लावा

दही लावल्याने त्वचा (Skin Care Tips) आतून सुधारण्यास मदत होते. उन्हातून घरी परतल्यावर चेहरा लाल आणि गरम असेल, तेव्हा थोडं थंड दही काढून चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने चेहरा स्क्रब करा आणि काही वेळ तसाच राहू द्या. यामुळे चेहरा थंड होतो आणि टॅनही काही प्रमाणात कमी होते.

चेहऱ्यावर बर्फ लावा

बर्फ थेट त्वचेवर लावू नका. एका स्वच्छ रुमालात बर्फाचे काही तुकडे टाकून ते चेहऱ्यावर लावा. हे काम काही काळ सतत करत राहा. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा आतून थंड होते. त्यामुळे सूज येण्यासोबतच लालसरपणा आणि खाज कमी होते.

दूध आणि लिंबाचा रस

दूध आणि लिंबाचा (Skin Care Tips) रस हा सन टॅनिंगसाठी अत्यंत उपयोगी मानला जातो. दूध तुमच्या त्वचेवर सन टॅनिंग रिव्हर्स करते.ते त्वचेला सूर्याच्या नुकसानीपासून वाचवते.कच्चे दूध कोलेजनच्या निर्मितीला प्रोत्साहन देते आणि त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहते.दोन चमचे कच्च्या दुधात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. ते चांगले मिक्स केल्यानंतर, या मिश्रणात एक कापसाचा गोळा बुडवा आणि त्वचेवर नीट लावा नंतर धुवून टाका, तुम्हाला फरक जाणवेल.

कोरफड आणि ग्लिसरीन

कोरफड आणि ग्लिसरीन हा एक चांगला सनस्क्रीन फॉर्म्युला आहे.ग्लिसरीन हे त्वचेवरील अतिनील किरण आणि पर्यावरणीय प्रदूषणाच्या विरोधात कार्य करते. एका स्प्रे बाटलीमध्ये कोरफड जेल, गुलाबपाणी आणि ग्लिसरीन एकत्र मिसळून पाणी मिसळून सनस्क्रीन तयार करा. आता ते चेहरा, हात आणि मान यांच्या त्वचेवर नियमितपणे लावा. यामुळे तुम्हाला टॅनची समस्या जाणवणार नाही.

News Title-  Skin Care Tips in summer
महत्वाच्या बातम्या-

पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करताय? तर चुकूनही ‘या’ चुका करू नका

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागांना बसणार फटका

तिसऱ्या लग्नानंतरही शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केले धक्कादायक कृत्य

लोकसभा निवडणुकीबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

घर बांधण्याचं स्वप्न महागणार? सिमेंटच्या किंमती ‘तब्बल’ एवढ्या रुपयांनी वाढणार