वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघामध्ये तिन्ही उमेदवार तगडे असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे इतर पक्षांच्या कार्यालयामध्ये जात नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. मनसेनं त्यांना पुण्यातून तिकीट न दिल्यानं त्यांनी मनसेतून बाहेर पडत वेगळा मार्ग स्विकारला आहे. त्यांना कालच वंचित बहुजन आघाडीतून पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. यावर आता काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Pune Lok Sabha)

पुणे लोकसभा मतदारसंघातून तिहेरी लढत

वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ लढणार आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर लढणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे लढणार आहेत. वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मोरेंच्या उमेदवारीनंतर धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया

“ही निवडणूक पुणेकर लढणार आहे आणि पुणेकर जिंकणार आहेत. लोकशाहीमध्ये कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो. त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे. जो उमेदवार लोकशाहीसाठी लढेल, लोकं त्यालाच मतदान करतील. वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांची उमेदवारी जाहीर केली. वसंत मोरे अनेक पक्षाच्या कार्यालयामध्ये गेले. लोकांना भेटले. ते कोणत्याही पक्षात गेले तरीही निवडणूक लढवणार होते. डोकं शांत ठेवा असाच माझा त्यांना सल्ला होता,” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

“मी पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांचा मला अशीर्वाद आहे. माझा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे मी माझ्या पुण्यासाठी मत मागणार आहे. लोकशाहीत अधिकार आहेत. सर्वांना संधी मिळते. कोणी कुठूनही उभं राहावं,” असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

रवींद्र धंगेकर यांना भाजपने ट्रोल केलं होतं. ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास !’,‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’, असा आशय लिहिलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. भाजपने धंगेकर यांना ट्रोल केलं होतं यावर आता रवींद्र धंगेकर यांनी त्यांना सुनावलं आहे.

भाजपने धंगेकर यांना ट्रोल केलं होतं त्यावर धंगेकर यांनी चांगलंच सुनावलं आहे. “ते माझ्या शिक्षणावर घसरले आहेत. त्यांना पराभव दिसतोय. माझी जनतेत पीएचडी दिसतेय. मला जनतेनं पीएचडीचं प्रमाणपत्र दिलं आहे.” असं म्हणत धंगेकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

News Title – Pune Lok Sabha In Vasant More Get Ticket After Ravindra Dhangekar Statement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार!

किंग कोहलीला हरवून केएल राहुलच्या संघाची दणक्यात टॉप-4 मध्ये एंट्री; पाहा संपूर्ण पॉईंट टेबल

कमाईची सुवर्णसंधी; भारती एअरटेल ग्रुपचा IPO आज उघडणार

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…