श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार अखेर ठरला!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kalyan Lok Sabha | कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) मतदारसंघातून सर्वात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. गेली अनेक दिवस झाले ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) मतदारसंघातून कोणता उमेदवार द्यायचा यावर प्रश्नचिन्ह होतं. ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तगडा नेता देण्यासाठी उद्धव ठाकरे अनेक दिवसांपासून विचार करत होते. शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना कल्याणमधून लोकसभेचं (Kalyan Lok Sabha) तिकीट देण्याबाबत चर्चा होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी वेगळी खेळी खेळली आहे.

वैशाली दरेकर यांना कल्याणमधून उमेदवारी

पालघर, हातकणंगले, कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. पालघरमधून भारती कामडी, हातकणंगले येथून सत्यजित पाटील आणि सर्वाधिक लक्ष वेधलेला मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) मतदारसंघ होय. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. (Kalyan Lok Sabha)

वैशाली दरेकर यांचा राजकीय संघर्ष थोडक्यात

वैशाली दरेकर यांचा राजकीय संघर्ष रंजक आहे. सुरूवातीला वैशाली दरेकर हे शिवसेना पक्षामध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा वैशाली दरेकर ठाकरे गटामध्ये आल्या आहेत.

वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर मनसे पक्षाची स्थापन झाल्यानंतर त्या पुन्हा मनसेमध्ये गेल्या. त्यावेळी त्या मनसेच्या माहापिलेकेच्या विरोधीपक्ष नेत्या होत्या. 2009 मध्ये त्यांनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.

शिवसेनेच्या आनंद परांजपे यांच्याविरोधामध्ये 2009 ला वैशाली दरेकर यांनी कल्याण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी 2 लाख 14 हजार 476 मते परांजपे यांना मिळाली होती. वसंत डावखरे यांना 1 लाख 88 हजार 267 मते मिळाली होती. तर दरेकर यांना 1 लाख 2 हजार 63 मते मिळाली होती. त्यावेळी दरेकर यांचा पराभव झाला असला तरीही मनसेनं पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्या आता श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहे.

उद्धव ठाकरे गटातून वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. कल्याणमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र अद्यापही कल्याणमधून शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या अधिकृत उमेदवारीवर घोषणा झाली नाही.

News Title – Kalyan Lok Sabha Election In Thackeray Shivsena Candidate Vaishali Darekar

महत्त्वाच्या बातम्या

वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘अशा’ व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत!

‘कॉफीऐवजी मी माझ्या दिवसाची सुरुवात सेक्सने करेन’; अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा ‘तो’ व्हिडिओ जोरदार व्हायरल!

15 मिनिटांत टॅनिंग निघेल, करा ‘हा’ उपाय