काँग्रेसचा संजय निरूपम यांना मोठा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Nirupam | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळामध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांचं स्टार प्रचारक यादीमध्ये नाव होतं. मात्र आता स्टार प्रचारक यादीतून संजय निरूपम (Sanjay Nirupam) याचं नाव हटवण्यात आलं आहे. यामुळे आता संजय निरूपम यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना संधी देण्यात आली. मात्र या जागेवर संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी दावा केला होता. मात्र ठाकरे गटाच्या उमेदवाराला संधी दिल्याने संजय निरूपम यांनी प्रचार करणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून संजय निरूपम यांना बडतर्फ केलंय.

काय म्हणाले नाना पटोले?

“संजय निरूपम यांचं नाव स्टारप्रचारकांच्या यादीतून रद्द करण्यात आलं आहे. ते ज्या पद्धतीनं वक्तव्य करत होते त्यावर कारवाई केली जाईल”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. संजय निरूपम यांना पश्चिम मुंबईतून लोकसभेचं तिकीट न दिल्यानं संजय निरूपम नाराज आहेत. ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.

संजय निरूपम यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पश्चिम मुंबई मतदारसंघातून संजय निरूपम लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र अमोल कीर्तिकर यांना संधी दिल्याने संजय निरूपम यांनी अमोल कीर्तिकरांचा विरोध केला आहे. त्यांच्यावर निरूपम यांनी खिचडी घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

संजय निरूपम शिंदे गटाच्या वाटेवर?

संजय निरूपम शिंदे गटाच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत. अमोल कीर्तिकर यांना पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर निरूपम यांनी वक्तव्य केलं होतं. “मी आठवडाभर बघेल नाहीतर माझा निर्णय घेईल”, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ते सातत्याने ठाकरे गटावर टीका करत आहेत म्हणून महाराष्ट्र काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

News Title – Sanjay Nirupam Remove From Star Campaigners List

महत्त्वाच्या बातम्या

ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना मोठा झटका!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट!

भाजपशी जवळीक असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वंचितची उमेदवारी, वंचितला नावही माहीत नव्हतं?

DC vs KKR | दिल्ली कॅपिटल्स आज कोलकाता नाईट रायडर्ससोबत भिडणार!

वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…