मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians | IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्याप एकही सामना जिंकता आला नाही. अशात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यातून कमबॅक करण्याची शक्यता आहे.

सूर्यकुमार यादवला आतापर्यंत आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) सुरुवातीचे सामने खेळता आलेले नाहीत. सूर्यकुमार दुखापतीमुळे सध्या संघाचा भाग नाही. लवकरच सुर्यकुमार यादव खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्स या हंगामातील आपला चौथा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 7 एप्रिल रोजी खेळणार आहे. एकूणच सूर्या फिट झाल्याची बातमी MI ला दिलासा देणारी आहे.

Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज

IPL 2023 मध्ये मुंबईसाठी 600 हून अधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव डिसेंबर 2023 पासून मैदानाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने सांगितलेलं की सूर्यकुमार मुंबईसाठी पहिले काही सामने खेळू शकणार नाही.

सूर्यकुमार यादव कमबॅक करण्याची शक्यता

सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्त्वाचा खेळाडू आहे. 2022 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबईने सूर्यकुमारला कायम ठेवलं होतं. सूर्यकुमारने मुंबईसाठी 85 सामन्यात 2641 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सची आयपीएलमध्ये निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईला हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वात सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी पराभूत केलं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने मुंबईचा वानखेडे स्टेडियममध्ये धुव्वा उडवला. हार्दिक तिन्ही सामन्यात कॅप्टन म्हणून अपयशी ठरला. त्यामुळे रोहित शर्मा याला पुन्हा एकदा कर्णधार करावं, अशी मागणी जोर धरतेय.

मुंबई इंडियन्स टीम– हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

पाहा व्हिडीओ- 

News Title :Biggest Good News for Mumbai Indians!

महत्त्वाच्या बातम्या- 

मलायका अरोरा होणार आई?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

काँग्रेसचा संजय निरूपम यांना मोठा झटका!

श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार अखेर ठरला!

अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर हातोडा, किरीट सोमय्या म्हणाले…

ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना मोठा झटका!