KKR vs DC l काल IPL 2024 चा 16 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ 166 धावा करू शकला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सने 106 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
केकेआरचा एकतर्फी विजय :
केकेआरसाठी फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी डावाची सुरुवात जबरदस्त केली. सॉल्ट केवळ 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी त्यानंतर सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी झाली. एकीकडे नरेनने 39 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांसह 85 धावांची तुफानी खेळी केली. तर IPL मधील पदार्पणाच्या डावात आंग्रिशने 27 चेंडू खेळून 54 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
शेवटच्या षटकांमध्ये आंद्रे रसेलने 41 धावा केल्या तर रिंकू सिंगनेही 8 चेंडूत 26 धावांची छोटीशी खेळी खेळून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोलकाताने पहिल्या 10 षटकात 135 धावा आणि शेवटच्या 10 षटकात 137 धावा करत दिल्लीच्या संघाचा पराभव केला आहे.
KKR vs DC l ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांची मेहनत व्यर्थ :
दिल्ली कॅपिटल्ससाठी डावाची सुरुवात खूपच खराब झाली. DC ने पहिल्या 33 धावांत 4 महत्त्वाचे विकेट गमावल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली, पण DC ला विजयापर्यंत नेण्यासाठी ती अपुरी ठरली.
ऋषभ पंतने 25 चेंडूत 55 धावांची महत्त्वपूर्ण खेळी तर स्टब्सने 32 चेंडूत 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर दिल्लीच्या संघाने सातत्याने विकेट गमावल्या, त्यामुळे दिल्लीला 106 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आपला दबदबा कायम राखला आहे. वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी मिचेल स्टार्कने आयपीएल 2024 मध्ये विकेटचे खाते देखील उघडले आहे. त्याने 3 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले आहेत. दरम्यान, वैभव अरोरानेही प्रभावित केले, ज्याने 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
News Title : kolkata knight Riders Beat Delhi Capitals By106 Runs
महत्त्वाच्या बातम्या-
कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस
‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा
भाजपचा दबाव?; शिंदे गटाने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!
मलायका अरोरा होणार आई?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल