‘त्या’ चर्चा खऱ्या ठरल्या; अभिनेत्रीच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर

Taapsee Pannu | बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार अशा चर्चा होत्या. तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्यासोबत लग्न केलं असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही अधिकृत अशी कोणतीच माहिती दिली नव्हती. अखेर तापसीच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

तापसीच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तापसी अखेर मॅथियस सोबत लग्नबंधनात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. 23 मार्च रोजी तापसी आणि मॅथियसने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. त्यांनी फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं असल्याचं म्हटलं गेलं.

तापसी पन्नूच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर

आता तापसीच्या  (Taapsee Pannu ) लग्नाचा पहिला व्हिडीओ अखेर समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होतोय. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तापसी आणि मॅथियसचा शानदार विवाहसोहळा पार पडला. या व्हिडीओवर चाहतेदेखील तापसीला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

व्हिडीओमध्ये तापसी खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाचा भरजरी ड्रेस, हातात चुडा, डोळ्यांवर गॉगल अशा खास अंदाजात, मस्त डान्स करत तापसी वरमाला विधीसाठी एंट्री करते. तर तिचा भावी पती मॅथियस हा क्रीम कलरची शेरवानी घालून, हसत तिची वाट पहात होता. त्यांच्या दोघांच्या लग्नाच्या हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओवर चाहत्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया

तापसी  (Taapsee Pannu ) ‘कोठे ते आ माहिया’ या गाण्यावर थिरकताना दिसून आली.नंतर दोघांनी एकमेकांना वरमाल घातल्या आणि त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. तापसी पन्नू आणि मॅथियास यांनी पंजाबी रिती-रिवाजानुसार लग्न केलं. तापसीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

तापसीच्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांचा समावेश होता. तापसीने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या सिनेमांत काम केलं आहे.दरम्यान, तापसी पन्नू आणि मॅथियास यांची पहिली भेट 2013 मधअये इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनादरम्यान झाली होती आता त्यांनी लग्नगाठ बांधत संसार थाटला आहे.

News Title : Taapsee Pannu Marriage Video Viral  

महत्वाच्या बातम्या-

धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा