ठाकरेंबरोबर वाजलं, पण आंबेडकरांचा शरद पवार गटाला पाठिंबा, घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. याआधी बारामतीतून शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर आपली इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर विजय शिवतारे यांचं बंड शांत झालं. त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर आता बारामतीतून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे.

गेल्या काही दिवसांआधी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत. महाविकास आघाडीवर ते जागावाटपावरून  नाराज आहेत. मात्र असं असलं तरीही प्रकाश आंबेडकर यांनी बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून (Baramati Lok Sabha) वंचित बहुजन आघाडीचा नेता नसल्याचं सांगितलं असून प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळेंचं ट्वीट

प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिल्याने सुप्रिया सुळे खूश आहेत. त्यांनी ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. “बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद.” म्हणत सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.

 

नणंद विरूद्ध भाऊजय

दरम्यान आता बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भाऊजय व्यतिरिक्त इतर कोणताही उमेदवार लढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार आहे. दोन्ही गटातून एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. अजित पवार यांच्याविरोधात संपूर्ण पवार कुटुंब आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याबाजूनं पवार कुटुंब प्रचार करत आहे. यामुळे अजित पवार बारामतीमध्ये सभेला संबोधित असताना मला कुटुंबाने एकटं पाडल्याचा दावा करत आहेत.

दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जात त्या मतदारांच्या भेटीगाठी करत आहेत.

News Title – Baramati Lok Sabha Election Prakash Ambedkar Support To Supriya Sule

महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट!

भाजपशी जवळीक असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वंचितची उमेदवारी, वंचितला नावही माहीत नव्हतं?

DC vs KKR | दिल्ली कॅपिटल्स आज कोलकाता नाईट रायडर्ससोबत भिडणार!

वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘अशा’ व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत!