Telegram Business Accounts l टेलिग्रामने आपल्या युझर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. टेलिग्रामने आता बिझनेस अकाउंटची सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही तुमचे टेलीग्राम अकाउंट हे बिझनेस अकाउंटमध्ये रूपांतरित करू शकता. टेलिग्रामचे हे फीचर्स वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कोडिंगची आवश्यकता लागणार नाही. हे नवीन फीचर्स तुम्हाला तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करण्यात मदत करणार आहे.
टेलिग्राम बिझनेस अकाउंटची वैशिष्ट्ये :
तुम्ही तुमचे टेलिग्राम बिझनेस अकाउंट चॅटबॉट्स जोडू शकता. हे चॅटबॉट्स ग्राहकांच्या मेसेजेसला आपोआप रिप्लाय देऊ शकतात. याच्या मदतीने तुम्ही तुमचे काम सोपे करू शकता आणि तुमच्या ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकता.
टेलिग्रामचे हे फीचर्स वापरकर्त्याला काही उत्तरे तयार करण्यास अनुमती देते. हे एक अतिशय उपयुक्त फीचर्स आहे. जेव्हा एखादा ग्राहक समान प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही ही तयार उत्तरे पटकन पाठवू शकता. या प्रतिसादांमध्ये मजकूर, लिंक्स, स्टिकर्स, फोटो किंवा फाइल्स देखील समाविष्ट असू शकतात.
Telegram Business Accounts l या फीचर्समुळे तुम्ही ग्राहकांना उत्पादनांची माहिती देऊ शकता :
या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या चॅटचे सुरुवातीचे पेज तुमच्या पद्धतीने क्रिएट करू शकता. येथे तुम्ही कोणताही विशेष मजकूर किंवा स्टिकर जोडू शकता, जो चॅट सुरू करण्यापूर्वी वापरकर्त्यांना दिसेल. याद्वारे तुम्ही तुमच्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती देखील देऊ शकता.
टेलिग्रामच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात आणि बंद होण्याची वेळ सांगू शकता. तसेच तुम्ही तुमचे लोकेशन देखील शेअर करू शकता. यामुळे तुमचे दुकान सुरू आहे की नाही हे ग्राहकांना कळू शकेल. टेलिग्रामचे हे फीचर युजरसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही कुठेतरी व्यस्त असाल किंवा दुकानात नसाल तेव्हा हे वैशिष्ट्य उपयोगी पडेल. तुम्ही एक संदेश सेट करू शकता जो तुमचे स्टोअर बंद असताना किंवा तुम्ही सुट्टीवर असताना ग्राहकांना आपोआप पाठवला जाईल.
Telegram Business किंवा Premium सह तुम्ही तुमच्या चॅटला विविध रंगांची लेबल देऊ शकता. याद्वारे तुम्ही ग्राहकांना त्यांच्या गरजा किंवा आवडीनुसार सहज ओळखू शकता. तसेच तुम्ही एक संदेश सेट करू शकता जो प्रत्येक नवीन ग्राहकाने चॅट सुरू करताच त्यांना आपोआप पाठवला जाईल. यामध्ये तुम्ही कोणतीही महत्त्वाची माहिती देऊ शकता.
News Title : Telegram New Features Business Accounts
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ चर्चा खऱ्या ठरल्या; अभिनेत्रीच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर
PPF खातेधारकांनो ‘या’ गोष्टीकडे लक्ष द्या, अन्यथा होऊ शकते लाखोंचे नुकसान
धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत
आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार