‘शाळकरी मुलांना…’; काँग्रेस नेत्याचा नितीन गडकरींवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. वेगवेगळ्या टप्प्यात राज्यामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहितेत कोणत्याही पक्षाचे चिन्ह, बॅनरबाजी, लहान मुलांचा वापर, तसेच जाती-धर्माचा कोणत्याही प्रकारे वापर करू नये असं सांगण्यात येतं. मात्र नागपूरमध्ये लहान मुलांचा वापर केल्याने आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा काँग्रेस नेत्यानं केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लहान मुलांचा वापर करत प्रचार केला असल्याचा दावा काँग्रेस नेत्याकडून करण्यात आला आहे. आचारसंहितेमध्ये लहान मुलांचा वापर करू नये असं बजावण्यात आलं आहे. मात्र आचारसंहिता लागू झाली तरीही नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लहान मुलांचा वापर केल्यानं आचारसंहितेचा भंग केला असल्याचा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे.

“लहान शाळकरी मुलांचा प्रचारासाठी वापर”

1 एप्रिल 2024 रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या शाळकरी मुलांना गडकरींच्या रॅलीमध्ये सामिल करण्यात आलं. दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान लहान शाळकरी मुलांचा प्रचारासाठी वापर करण्यात आला. यामुळे आचारसंहितेला बाधा पोहोचल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे. (Nitin Gadkari)

Nitin Gadkari

“लहान शाळकरी मुलांचा प्रचारासाठी वापर करणे हे कायद्याचे उल्लंघन करणारं आहे. लहान मुलांचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. बालकामगार प्रतिबंध कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी शाळेच्या प्राचार्यांचं निलंबन करण्यात यावं. तसेच याविरोधात निवडणूक आयोगानं दखल घेऊन कारवाई करावी”, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. (Nitin Gadkari)

काय म्हणाले होते गडकरी?

गडकरी आचारसंहितेआधी म्हणाले होते की, “निवडणुकीच्या काळामध्ये मी प्रचार करणार नाही, चहापाणी करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनरबाजी करणार नाही. मते असतील तर द्या नाहीतर देऊ नका,” असं गडकरी यांनी भाष्य केलं होतं. मात्र गडकरी यांच्या वक्तव्यावर लोंढे यांनी पलटवार केला आहे. निवडणूक सुरू झाल्यानंतर गडकरी यांना गल्लीबोळात फिरावं लागत असल्याचा टोला लोंढे यांनी लगावला आहे.

News Title – Nitin Gadkari Use School Students For Campaign Congress Complaint To Election Commission

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

मलायका अरोरा होणार आई?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

काँग्रेसचा संजय निरूपम यांना मोठा झटका!

श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार अखेर ठरला!

अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर हातोडा, किरीट सोमय्या म्हणाले…