राहुल गांधींची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Loksabha Election 2024 | देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने आपले जवळपास बरेच उमेदवार जाहीर केले आहेत. तर, काल (4 एप्रिल) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरळच्या वायनाड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली.

या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी 4.3 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. तर म्युच्युअल फंडात 3.81 कोटींची गुंतवणूक आहे. तसंच राहुल गांधी यांच्या बँक खात्यात 26.25 लाख रुपये आहेत आणि 55 हजारांची रोकड सध्या राहुल गांधी यांच्याकडे आहे.

राहुल गांधींच्या संपत्तीचा आकडा समोर

त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न 1.02 कोटी असल्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच त्यांच्याकडे 15.2 लाखांचे गोल्ड बॉण्ड ,राष्ट्रीय बचत योजना, पोस्ट खात्यात बचत, इन्शुरन्स पॉलिसि आणि इतर मिळून 61.52 लाखांची गुंतवणूक आहे.

राहुल गांधी यांच्याकडे 4.2 लाखांचे दागिनेदेखील आहेत. त्यांची एकूण जंगम मालमत्ता 9.24 कोटी आणि 11.14 कोटींची स्थावर मालमत्ता असून अशी एकूण 20 कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्यावर 49.7 लाखांचे कर्जदेखील आहे.

राहुल गांधी वायनाडमधून लढणार

राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती पोस्टद्वारे दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी वॉड्रा, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणूगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत (Loksabha Election 2024) राहुल गांधींना सीपीआयच्या ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा आणि भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांचं आव्हान असणार आहे. ही निवडणूक भारताच्या आत्म्याचा लढा आहे. भारतमातेचा आवाज दाबू पाहणाऱ्या द्वेष, भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या शक्तींपासून आपली लोकशाही टिकवण्याचा हा लढा असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी या दीड वर्षांत ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘भारत न्याय यात्रा’ केल्या आहेत. यातून त्यांना जनतेचं भरभरून प्रेम मिळालं. या यात्रेद्वारा राहुल गांधी यांनी मतदारांवर प्रभाव पाडला आहे. 2019 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा चार लाखांच्या मताधिक्याने विजय झाला होता. यंदाही ते विजयाचे दावेदार मानले जात आहेत.

News Title : Loksabha Election 2024 Rahul Gandhi wealth figure in front

महत्त्वाच्या बातम्या-

ठाकरेंबरोबर वाजलं, पण आंबेडकरांचा शरद पवार गटाला पाठिंबा, घेतला मोठा निर्णय

‘त्या’ चर्चा खऱ्या ठरल्या; अभिनेत्रीच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर

PPF खातेधारकांनो ‘या’ गोष्टीकडे लक्ष द्या, अन्यथा होऊ शकते लाखोंचे नुकसान

धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार