रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राडा!, उदय सामंतांनी वाढवलं राणेंचं टेन्शन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघाच्या जागेवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी दावा केला. ते मागे हटत नव्हते. मात्र त्यानंतर त्यांनी काल-परवा सोशल मीडियावर पोस्ट करत माघार घेतल्याची भूमिका स्पष्ट केली. मात्र आता शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघाच्या जागेवर दावा केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार लढेल आणि आम्ही केलेला दावा सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी भाजपच ही जागा लढेल, असा दावा केला होता. राणेंच्या त्या वक्तव्याचा उदय सामंत यांनी समाचार घेतला.

काय म्हणाले उदय सामंत?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघं आम्हाला विश्वासात घेत निर्णय घेतील. कोण निवडून येणार, हे तपासूनच उमेदवार निश्चित करण्याच निकष लावलेला असून या मतदारसंघात शिवसेनेचा वरचष्मा आजही आहे”, असं सामंत म्हणाले.

रत्नागिरीमध्ये बैठक बोलावण्यात आली. मात्र अधिक गर्दी वाढल्याने बैठकीचे रूपांतर हे सभेमध्ये झालं. त्यावेळी सभेला संबोधित करत असताना उदय सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. “रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) दावा सोडलेला नाही. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत वाट पाहावी. निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवार निश्चित केला जाईल”, असं धोरण ठरवलं आहे.

राणे यांच्या उमेदवारीवर अडचण?

“शिवसेना या मतदारसंघामध्ये प्रबळ आहे. किरण सामंत शिवसेनेच्या खासदारकीचे प्रबळ दावेदार आहेत. आम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन देण्याची गरज नाही.” असं म्हणत विनायक राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला. तसेच “शिवसेनेचा या जागेवर दावा असेल”, अशी सामंत यांनी भूमिका मांडल्यानं आता नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबत अडचण निर्माण होऊ शकते.

News Title – Ratnagiri Sindhudurg Lok Sabha In Uday Samant Statement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

या राशींच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादात पडू नका

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला दिला घरचा आहेर; गिलची खेळी ठरली व्यर्थ

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर