राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची चाहूल लागत आहे. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळी आणि रात्री उष्ण हवा जाणवत आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. या सोबतच पुढील तीन महिन्यात राज्यात अणखी तापमान वाढणार असल्याचं म्हटलं आहे.

तीन महिन्यात तापमान वाढणार?

शहरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचं ऊन वाढलं आहे. एवढंच नाही तर काही भागात तापमानात 40% पार झाल्याचं चित्र समोर आलं आहे. दरम्यान, पुण्याचे हवामान विभागाचे (Weather Update) डाॅ. होसाळीकर यांनी वाढत्या तापमानाबदल महत्त्वाची माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी सांगितलं की, येत्या तीन महिन्यात मराठवाड्याच्या तापमानात वाढ होणार आहे.

रात्रीच्या तापमानात वाढ-

पुढे होसाळीकर म्हणाले की, दिवसा असणाऱ्या तापमानाप्रमाणे रात्रीच्याही तापमानात (Weather Update) वाढ होण्याची शक्यता असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. तर मातीतली आर्द्रता कमी होण्यासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

असे पुण्यात पूर्वानुमान देण्यात आले आहे. सध्या दिवसाचं तापमान 40 अंशाच्यावर गेलं आहे. हे या ऋतुतलं तापमान असल्याने 40 अंशापेक्षा जास्त तापमान असतं तेव्हा काळजी घेणं गरजेचे असते असेही त्यांनी म्हटले.

मार्चपासून जूनपर्यंत मान्सूनपूर्व हंगाम

राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 40 अंशाच्या पुढे पारा वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनूसार मार्चपासून जूनपर्यंत मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खूप बदल घडवून आणत असतो. एवढंच नव्हे तर कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो.

News Title : weather update high temperature in Marathwada

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! ‘या’ बड्या नेत्याने दिला काँग्रेसचा राजीनामा

दिल्लीला ‘ती’ चूक पडली भारी!, ऋषभ पंतसह संघावर मोठी कारवाई

“मला हे जाणवलंय की…”; लग्नानंतर तापसी पन्नूचा सर्वात मोठा खुलासा!

पवारांचा मोठा गेम; बीडमधून पंकजा मुंडे विरुद्ध ‘या’ नेत्याला उमेदवारी

मोठी बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभेच्या रिंगणात