दिल्लीला ‘ती’ चूक पडली भारी!, ऋषभ पंतसह संघावर मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

KKR vs DC l आयपीएल हंगामातील 16 वा सामना काल (3 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकात 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ 166 धावाच करू शकला. त्यामुळे दिल्ली 106 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाली.

या सामन्यात पराभूत होऊनही दिल्ली कॅपिटल्सला अजून एक मोठा धक्का बसला. दिल्लीच्या कॅप्टनसह टीमवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध स्लो ओव्हर रेट बद्दल दिल्ली कॅपिटल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

ऋषभ पंतवर मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर आयपीएलच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली असून चालू हंगामातील दिल्लीने षटकांची गती धीमी राखण्याची ही दुसरी वेळ होती. या कारवाईनुसार ऋषभ पंतवर 24 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. चुकांची पुनरावृत्ती झाल्यास कठोर दंड ठोठावला जातो.

ऋषभ पंतसह दिल्लीच्या (KKR vs DC) संघावरही कारवाई केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमधील 11 खेळाडूंनाही ही चूक खूपच महागात पडली आहे. त्यांना 6 लाख रुपये किंवा मॅच फी मधील 25 टक्के रक्कम म्हणजे जी कुठली रक्कम कमी असेल, ती कापण्यात येईल.

कोलकाताकडून दिल्ली पराभूत

दरम्यान, कालच्या सामन्यात केकेआरने आयपीएल हंगामातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. यापूर्वी सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध 277 धावा केल्या होत्या. तर, कालच्या सामन्यात केकेआरने 7 बाद 272 असा धावांचा (KKR vs DC) डोंगर उभारला. केकेआरसाठी फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी डावाची सुरुवात जबरदस्त केली. सॉल्ट केवळ 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी त्यानंतर सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी झाली.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्ससाठी डावाची सुरुवातच खराब झाली. DC ने पहिल्या 33 धावांत 4 महत्त्वाचे विकेट गमावल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली, पण DC ला विजयापर्यंत नेण्यासाठी ती अपुरी ठरली.

News Title- KKR vs DC Rishabh Pant Fined 24 Lakhs for Slow Over Rate Offense

महत्त्वाच्या बातम्या –

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा

भाजपचा दबाव?; शिंदे गटाने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला