Tapsee Pannu | बाॅलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू कायम तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. तापसी सोशल मीडियावर आपल्या चित्रपटाचे किंवा वेबसिरीजचे प्रमोशन शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तापसीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तिच्या बोल्ड आणि हाॅट लूक्समुळे तिने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान तापसीने लग्न केल्याचं समोर आलं. यावेळी तिच्या चाहत्यांना धक्का बसला तर अनेकांना खोटं वाटलं. मात्र, सोशल मीडियावर तापसीच्या लग्नाची बातमी हव्यासारखी पसरली. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर तिच्या लग्नाचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला.
तापसीचं वक्तव्य चर्चेत-
सोशल मीडियावर तापसीच्या (Tapsee Pannu) लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला. तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथियस बोबरोबर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. मित्रपरिवार आणि कुटुंबासमवेत दोघांनी गुपचूप लग्नसोहळा उरकला. सध्या इंटरनेटवर तापसीच्या लग्नाचीच चर्चां सुरू आहे. मात्र, लग्नानंतर तापसीने एक मुलाखत दिली. बोलत असताना तापसीने विधान केलं, ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
काय म्हणाली तापसी?
मुलाखतीमध्ये बोलत असताना तापसीने (Tapsee Pannu) तिच्या करियरबदल भाष्य केलं. तापसी म्हणाली की, आता या क्षणाला मला असं वाटत आहे की, माझ्या व्यवासायिक निवडी मोठ्या प्रमाणात माझ्या वेळेच्या मूल्यावर आधारित आहेत. एवढंच नाहीतर, माझा एखादा प्रोजेकट घेऊन मी माझा वेळ सत्कारणी लावत आहे की नाही याची मला खात्र करुन घ्यायची आहे.
“तुमच्या आजूबाजूला नेहमीच असे लोक”
पुढे ती म्हणाली की, “तुमच्या आजूबाजूला नेहमीच असे लोक असतील, ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा काही गोष्टी जास्त किंवा कमी असतील. आयुष्याच्या शिखरावर उंच ठिकाणी पोहोचण्याच्या धडपडीत आपण हे विसरतो की असं कोणतचं उंच ठिकाण आयुष्यात नसतं. मला हे जाणवलंय की, माझ्या व्यवसायाच्या पलीकडे जीवनाचा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने जगायचा आहे आणि हे मला सुनिश्चित करायचं आहे.”
News Title : tapsee pannu talks about her carrier
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभेच्या रिंगणात
आता ‘या’ शहराचंही नाव बदलणार?; मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
उन्हाळ्यात नारळाचं पाणी म्हणजे अमृतच; मिळतात ‘इतके’ फायदे
RBI चा महत्त्वाचा इशारा; झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट
अशी लोकं शिक्षण घेऊनही मुर्ख असतात; दुसऱ्यांनाही करतात बर्बाद