मोठी बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभेच्या रिंगणात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Parbhani Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुकीचं घोडेमैदान आता फार लांब राहिलं नाही. आगामी लोकसभा निवडणुकीआधी अनेक ट्वीस्ट घडत आहेत. अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळालं. अद्यापही जागावाटपाचा प्रश्न सुटलेला दिसत नाहीये. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत होते. मात्र त्यांनी काही दिवसांआधी आघाडीतून बाहेर पडत वेगळा मार्ग निवडला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्वसामान्य उमेदवारांना संधी दिली आहे. काल-परवा प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातून वसंत मोरे यांना लोकसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. आता परभणी लोकसभा (Parbhani Lok Sabha) मतदारसंघाचा उमेदवार बदलून प्रकाश आंबेडकर यांनी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना संधी दिली आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना संधी

परभणी मतदारसंघातून (Parbhani Lok Sabha) प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र पुन्हा परभणी लोकसभा (Parbhani Lok Sabha) मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांची नवीन खेळी महायुती आणि आघाडीवर भारी पडू शकते. आपल्या युट्युबच्या माध्यमातून हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकांच्या घरोघरी पोहोचले आहेत. त्याचा परभणी लोकसभा (Parbhani Lok Sabha) मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल का? हे पाहणं गरजेचं असेल.

परभणीतून पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरला. परभणीतून महाविकास आघाडीकडून बंडू जाधव, महायुतीकडून महादेव जानकर तर पंजाबराव डख यांना वंचित बहुजन आघाडीने परभणीतून उमेदवारी जाहीर केली.

प्रकाश आंबेडकर हे सामान्य लोकांना वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी देत आहेत. सामान्य लोकांना उमेदवारी देण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी 19 लोकांना उमेदवारी दिली. त्यातील तीन जागांवर उमेदवार बदलले आहेत.

वंचितने तीन उमेदवार बदलले

वंचितने रामटेक लोकसभा मतदारसंघातून शंकर चहांदे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र शंकर चहांदे यांनी उमेदवारीतून माघार घेतली. त्यानंतर यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सुभाष पवार यांना संधी देण्यात आली. मात्र त्यांच्याऐवजी अभिजीत राठोड यांना संधी दिली. तिसरी उमेदवारी ही परभणीतून बंडू जाधव यांच्याऐवजी आता पंजाबराव डख यांना देण्यात आली आहे.

News Title – Parbhani Lok Sabha in prakash Ambedkar ticket to punjabrao Dakh

महत्त्वाच्या बातम्या

अशी लोकं शिक्षण घेऊनही मुर्ख असतात; दुसऱ्यांनाही करतात बर्बाद

54 वर्षांनंतर येणारं सुर्यग्रहण ‘या’ चार राशींसाठी असणार लाभदायक!

CSK चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

उष्णतेपासून पुणेकरांना दिलासा मिळणार, ‘या’ तारखेला पावसाची शक्यता

नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!