नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Navneet Rana | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून नवनीत राणांवर (Navneet Rana) जात प्रमाणपत्रावरून टीका होत होती. त्याबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांना जात प्रमाणपत्राबाबत दिलासा मिळाला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध

अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र आजचा दिवस भाजप आणि नवनीत राणा यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्राची सुनावणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करत जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला आहे. यामुळे आता नवनीत राणा (Navneet Rana) यांना दिलासा मिळाला आहे.

काय होतं प्रकरण?

2013 रोजी नवनीत राणा यांना मोची जात प्रमाणपत्र दिलं होतं. त्यानंतर ते जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने वैध ठरवलं. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय खोटा ठरवला. नवनीत राणा या मोची नसून पंजाबी समाजाच्या आहेत असा दावा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला.

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्याचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता त्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला होता.

नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे.के.माहेश्वरी, संजय करोल खंडपीठाने एकमताने निर्णय दिला. त्यात नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं.

News Title – Navneet Rana Cast Certificate Valid Supreme court Verdict

महत्त्वाच्या बातम्या

‘नक्की काय घडलंय हे सांगायचंय’; ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण

अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या पूजेची तारीख, वेळ आणि शुभ योग

राहुल गांधींची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

‘शाळकरी मुलांना…’; काँग्रेस नेत्याचा नितीन गडकरींवर गंभीर आरोप

आता टेलिग्रामवर देखील तयार करता येणार Business Accounts; व्यवसायकांना होणार फायदाच फायदा