उष्णतेपासून पुणेकरांना दिलासा मिळणार, ‘या’ तारखेला पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Weather Update | देशासह राज्यातही तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भाकडील अकोला, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात 4 एप्रिलनंतर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

येथे 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढणार आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथेही उकाडा वाढेल. विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे 5 एप्रिलला व यवतमाळला 4 एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानंतर आठवड्याच्या शेवटी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

पुण्यातही (Pune Weather Update) तापमान वाढत असल्याने उकाडा वाढला आहे. 29 मार्च रोजी शिवाजीनगर येथे रात्रीचे सर्वाधिक तापमान 23.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा 6.1 अंश सेल्सिअसने अधिक आहे. यासोबतच कोरेगाव पार्क, वडगाव शेरी या भागातही रात्रीचे तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले.

2 एप्रिल रोजी पुण्यातील तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली. यामुळे शिवाजीनगर येथे 18.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आता पुण्याला उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 आणि 8 एप्रिल रोजी शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उष्णतेपासून दिलासा मिळणार

येत्या दोन तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहणार आहे. कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसने वाढ होईल. 5 ते 8 एप्रिलरोजी मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 ते 8 एप्रिल दरम्यान कोकण, गोवा, मराठवाडा तर विदर्भात 7 ते 8 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुण्यात (Pune Weather Update) येत्या एक-दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर वातावरण कोरडे राहील. येथे पुढील 72 तास दिवसाचे तापमान उच्चांकी पातळीवर राहील. येत्या 7 ते 8 एप्रिलदरम्यान हलक्या पावसामुळे पुणेकरांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल.

News Title- Pune Weather Update  

महत्वाच्या बातम्या-

अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या पूजेची तारीख, वेळ आणि शुभ योग

राहुल गांधींची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

‘शाळकरी मुलांना…’; काँग्रेस नेत्याचा नितीन गडकरींवर गंभीर आरोप

आता टेलिग्रामवर देखील तयार करता येणार Business Accounts; व्यवसायकांना होणार फायदाच फायदा

ठाकरेंबरोबर वाजलं, पण आंबेडकरांचा शरद पवार गटाला पाठिंबा, घेतला मोठा निर्णय