Raj Thackeray | येत्या 9 एप्रिलला मराठी नववर्ष दिनी सायंकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अशातच मनसेकडून सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली आहे. मनसेचा गुढी पाडव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. त्यातून एक सूचक विधान करण्यात आलंय. वक्ता एक…लक्ष-लक्ष श्रोते! नवनिर्माणाची गुढी उभारू… येताय ना!9 एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगायचं आहे, अशी मनसेची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज ठाकरेंचा पाडवा मेळावा
राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असं मनसेने लाँच केलेल्या टीझरमध्ये म्हटलं आहे.यासोबतच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता काय बोलणार, याची सर्वांना प्रतिक्षा असणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज ठाकरे यांच्या मेळाव्यात ते नेमकं कुणाला टार्गेट करणार, कोणता नवीन मुद्दा मांडणार याबाबत सर्वच उत्सुक आहेत. मध्यंतरी त्यांनी दिल्लीत पुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत भाजपाचे नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चा रंगल्या होत्या.
चला शिवतीर्थ … #RajThackeray pic.twitter.com/H80II1Jzyw
— Gajanan Kale (@MeGajananKale) April 3, 2024
राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार?
मनसेकडून दोन जागांची मगणी करण्यात आली, अशीही चर्चा मागे झाली. त्यामुळे मनसे निवडणूक लढवणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झालेली आहे. यासंदर्भात राज ठाकरे या मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करू शकतात.
येत्या 9 एप्रिल रोजी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. मनसेकडून अद्याप एकही उमेदवार घोषित झाला नाहीये. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दलचा सस्पेन्स वाढलेला असतानाच मनसेचा गुढी पाडव्याचा टीझर आता समोर आला आहे. या पाडवा मेळाव्यात सर्वांचं लक्ष फक्त राज ठाकरे यांच्यावर राहील.
News Title : Raj Thackeray Gudhi Padwa Sabha Posts Viral
महत्वाच्या बातम्या-
धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत
आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार
शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत
कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस
‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा