तिसरं लग्न करुनही शोएब मलिकचं मन भरेना, नवा कारनामा समोर आल्याने खळबळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Malik & Nawal Saeed l अगदी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न केल्याने चर्चेत आला होता. अशातच आता पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक एका कारणांमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री नवल सईदने शोएब मलिकवर गंभीर आरोप केले आहेत. शोएब मलिकवर नवल सईदसोबत फ्लर्ट केल्याचा आरोप केला आहे.

अभिनेत्यांकडून फ्लर्टी मेसेज येतात का? :

अलीकडेच नवल सईद, एजाज अस्लम आणि नादिया खान यांनी आयोजित केलेल्या रमजान कार्यक्रमात एक खुलासा केला आहे. या कार्यक्रमात अभिनेत्यांकडून फ्लर्टी मेसेज येतात का? असा प्रश्न नवल सईदला विचारण्यात आला होता.

नवलने सांगितले की, मला एका क्रिकेटरचे सतत मेसेज येत असतात. मात्र मला ते योग्य वाटत नाही. आम्ही क्रिकेटपटूंचा खूप आदर करतो आणि त्यांनी त्यानुसार वागले पाहिजे. शोमधील पाहुण्यांनी तिला विचारले की ती कोणत्या क्रिकेटरबद्दल बोलत आहे? तो शोएब मलिक आहे का? या प्रश्नांवर नवलने हसत हसत अप्रत्यक्षपणे खुलासा केला की, तो खरंच क्रिकेटपटू शोएब मलिकच आहे. मात्र नवलचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

Shoaib Malik & Nawal Saeed l कोण आहे नवल सईद? :

दरम्यान क्रिकेटपटू शोएब मलिकच्या फ्लर्ट प्रकरणामुळे सध्या चर्चेत आलेली नवल सईद नेमकी कोण आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर आज आपण शोएब मलिकवर आरोप करणारी महिला कोण आहे हे जाणून घेऊयात…

तर नवल सईद ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, जिने 2017 मध्ये याकीन का सफर मधील छोट्या भूमिकेतून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. तेव्हापासून तिने इजबान, फरियाद, सितम, दिल ए वीरण, दाग ए दिल आणि माह ए तमम या नाटकांमध्ये काम केले आहे. आता अभिनेत्री नवल जान-ए-जहाँ शोमध्ये दिसत आहे, त्यामध्ये प्रेक्षकांना तिचा रहस्यमय आणि मनोरंजक अभिनय आवडतो.

News Title : Shoaib Malik Send Flirty Texts To Actress Nawal Saeed?

 

महत्वाच्या बातम्या-

‘नक्की काय घडलंय हे सांगायचंय’; ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण

अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या पूजेची तारीख, वेळ आणि शुभ योग

राहुल गांधींची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

‘शाळकरी मुलांना…’; काँग्रेस नेत्याचा नितीन गडकरींवर गंभीर आरोप

आता टेलिग्रामवर देखील तयार करता येणार Business Accounts; व्यवसायकांना होणार फायदाच फायदा