“भाजपने एकनाथ शिंदेंना ताटाखालचं मांजर बनवलंय”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वत:कडे खेचल्यानं एकनाथ (Eknath Shinde) शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वत:कडे घेतल्याच्या शिंदे गटातून तक्रारी आल्या होत्या. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांचाच सोबती असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

“भाजपने ताटाखालचं मांजर बनवून ठेवलं”

एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन चार महिन्यांपुरता उरलाय. विधासभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही असा दावा अंबादास दानवे यांनी केलाय. तसेच भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आणि जे पवार आहेत यांना ताटाखालचं मांजर बनवून ठेवलं आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केलीये.

मोदींकडे विचार करायला काही संधी आहे का?, यांना तरी कुणी विचारतं का? मोदींकडे फक्त मोदी आणि अमित शाह यांचा विचार चालतो, बाकी कोणाचाही विचार चालत नाही, असंही दानवे म्हणालेत.

शिवसेनाप्रमुख आणि उद्धवजी हे ज्यावेळी नेतृत्व करत होते त्यावेळेस कधी भारतीय जनता पार्टीची हिंमत झाली नाही की तुमचा उमेदवार हा असावा असं बोलण्याची. जागावाटप हे पक्षाचे होत असते, त्यांनी त्यांचा त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु हे नवीनच होत आहे, असंही दानवे म्हणाले.

“महायुती आहे की महाबेकी”

महायुती आहे की महाबेकी आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. खरंतर तिकडेच बेकी आहे, आमच्याकडे सगळी एकी आहे असे सांगत अंबादास दानवेंनी महायुतीला टोला लगावला.

शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा फायनल झाल्या आहेत. 21 उमेदवार पूर्णपणे जाहीर झालेले आहेत. मुंबईतील काही विषय बाकी आहेत. काँग्रेस लढणार नसेल तर शिवसेना या जागा लढवणार अशा प्रकारची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, अशी माहिती दानवेंनी दिलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘नक्की काय घडलंय हे सांगायचंय’; ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण

अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या पूजेची तारीख, वेळ आणि शुभ योग

राहुल गांधींची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

‘शाळकरी मुलांना…’; काँग्रेस नेत्याचा नितीन गडकरींवर गंभीर आरोप

आता टेलिग्रामवर देखील तयार करता येणार Business Accounts; व्यवसायकांना होणार फायदाच फायदा