पवारांचा मोठा गेम; बीडमधून पंकजा मुंडे विरुद्ध ‘या’ नेत्याला उमेदवारी

sharad pawar

मुंबई | शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. बीडमध्ये शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत असताना शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनावणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे निकष लक्षात घेता शरद पवार (Sharad Pawar) गटाने बजरंग सोनावणे यांना बीडमधून उमेदवारी देऊ केली आहे.

पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे

अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेलेल बजरंग सोनवणे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. बजरंग सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीदेखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते सर्वाधित मते मिळवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते.

बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत रंगेल. याआधी पहिल्या उमेदवार यादीत शरद पवार गटाने 5 उमेदवार जाहीर केले होते. आता नव्याने दोन उमेदवारांची दुसरी यादी शरद पवार गटाने जाहीर केली आहे.

शरद पवार गटाकडून भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

News Title : Pankaja Munde vs Bajrang Sonawane

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभेच्या रिंगणात

आता ‘या’ शहराचंही नाव बदलणार?; मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

उन्हाळ्यात नारळाचं पाणी म्हणजे अमृतच; मिळतात ‘इतके’ फायदे

RBI चा महत्त्वाचा इशारा; झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट

अशी लोक शिक्षण घेऊनही मुर्ख असतात; दुसऱ्यांनाही करतात बर्बाद

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .