RBI चा महत्त्वाचा इशारा; झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RBI warning | आजकाल सायबर फ्रॉडचं प्रकरण खूप वाढले आहेत. डिजिटल युगात फ्रॉड करणारे गुन्हेगारही तेवढ्याच प्रमाणात आहेत. त्यामुळे कोणतीही ऑनलाइन क्रिया असो किंवा इतर काही काम खूप काळजीपूर्वक करणं आवश्यक असतं. अन्यथा असे फ्रॉड टपुनच बसलेले असतात. तुमची एक चूक तुमचं लाखोंचं नुकसान करू शकते.

आरबीआयने खातेधारकांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली आहे. क्रेंद्रीय बँकांनी लोकांना याविषयी सावध केलं. कारण स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी रोज काही न काही चाल खेळत असतात. असंच अनोळखी लिंकच्या माध्यमातून लोकांची फसववणूक करण्याची पद्धत अली आहे.

डिजिटली फ्रॉडचे प्रकरण वाढले

स्कॅमर्स फिशिंग लिंकच्या माध्यमातून टार्गेट करतात. कोणी यांच्या जाळ्यात अडकताच, स्कॅमर्स त्यांचे बँकिंग डिटेल्स चोरी करुन घेतात आणि त्यातील पैसे लबाडतात. यासंबंधी आरबीआयने एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये केंद्रीय बँकेने अनोळखी लिंक्सवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. या लिंक्स SMS किंवा ईमेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.

तुम्ही जर या लिंक्सवर क्लिक केलं तर स्कॅमर्स तुमच्या बँक अकाउंटमध्ये घुसून तुमचे पैसे चोरू शकतात. या प्रकरणाचे अनेक बळी ठरले आहेत. स्कॅमर्स फक्त फिशिंग लिंकच्या माध्यमातून नाही तर OTP च्या नावावर, कस्टमर केअर, सेक्सटॉर्शल (RBI warning) आणि दुसऱ्या पद्धतीनेही फ्रॉड करतात. अशा फ्रॉडमध्ये स्कॅमर्स लोकांना कॉल करतात आणि ते अधिकारी असल्याचं सांगून समोरच्याला धमकावतात. एवढंच नाही तर हे स्कॅमर्स लोकांना घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टही करतात.

स्कॅमर्सपासून ‘असा’ करा बचाव

डिजिटल युगात तुम्हालाही सतत जागृत राहणं आवश्यक आहे. नवीन माहिती आणि नवीन यंत्रणाबद्दल तुम्हाला अपडेट राहावं लागेल. कोणत्याही अनोळख्या लिंकवर क्लिक करु नका. आमिष दाखवलेल्या मेसेज किंवा ईमेलच्या जाळ्यात अडकू नका. त्याला बळी पडू नका. अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या कॉल्सवर शांततेत रिअॅक्ट करा.

त्यांच्या (RBI warning) माहितीवर लगेच अडकून विश्वास ठेवू नका. तुम्हाला कोणी पोलिसांच्या नावावर धमकावत असेल, तर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कोणी तुमच्यासोबत स्कॅम करण्याचा प्रयत्न करतोय असं जाणवलं तर लगेच पोलिसांना याची माहिती द्या. अशा प्रकारे तुम्ही डिजिटली फ्रॉड किंवा स्कॅमर्सपासून स्वतःचा बचाव करू शकता.

News Title : RBI warning regarding Cyber ​​Frau

महत्त्वाच्या बातम्या-

उष्णतेपासून पुणेकरांना दिलासा मिळणार, ‘या’ तारखेला पावसाची शक्यता

नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!

“भाजपने एकनाथ शिंदेंना ताटाखालचं मांजर बनवलंय”

तिसरं लग्न करुनही शोएब मलिकचं मन भरेना, नवा कारनामा समोर आल्याने खळबळ!

‘नक्की काय घडलंय हे सांगायचंय’; ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण