पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला दिला घरचा आहेर; गिलची खेळी ठरली व्यर्थ

GT vs PBKS Highlights l इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने पंजाबला 200 धावांचे लक्ष्य दिले होते. त्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 19.5 षटकांत 7 गडी गमावून विजयाचा पताका रोवला आहे. मात्र या सामन्यात शशांक सिंगने 29 चेंडूत 61 धावांची नाबाद विजयी खेळी खेळली आहे. याशिवाय प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या आशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावांची अप्रतिम खेळी खेळून सर्वांना आकर्षित केले आहे.

शशांक सिंगची तुफानी खेळी :

गुजरातच्या 200 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जच्या शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाची सुरुवात केली. मात्र धवन केवळ 1 धावा करून परतला आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला प्रभसिमरन सिंगही नूर अहमदच्या चेंडूवर 35 धावा करून बाद झाला. तर सॅम कुरन आणि सिकंदर रझा अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या फलंदाज म्हणून आले आणि लगेचच परतले. पण या रोमांचक सामन्यात शशांक सिंग खंबीरपणे उभा होता. त्याने केवळ सामन्यात संघाचे पुनरागमन केले नाही तर संघाला विजय देखील मिळवून दिला आहे.

शशांकने 29 चेंडूत 61 धावांची खेळी करत पंजाबला पराभवाचा सामना करून विजय मिळवून दिला आहे. दुसरीकडे, प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या आशुतोष शर्मानेही 17 चेंडूंत 31 धावांची शानदार खेळी केली. गुजरातकडून नूर अहमदने सर्वाधिक दोन बळी घेतले. तर उर्वरित गोलंदाजांना प्रत्येकी एक यश मिळाले आहे.

GT vs PBKS Highlights l गिलची खेळी व्यर्थ ठरली :

नरेंद्र मोदी स्टेडियमवर 199 धावा झाल्यानंतर गुजरातने पंजाबचे 4 विकेट केवळ 70 धावांवर घेतले होते. मात्र त्यानंतर शशांक सिंगची एंट्री झाली आणि त्याच्या खेळीने संपूर्ण सामना फिरला. अशातच गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने पहिल्याच ओव्हरमध्ये षटकार मारून संघाची सुरवात चांगली केली.

शुभमन गिलने या मोसमातील पहिले अर्धशतक अवघ्या 31 चेंडूत झळकावले आहे. यानंतरही त्याने पंजाबच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरूच ठेवले आणि अखेर अवघ्या 49 चेंडूत 89 धावा करून तो नाबाद माघारी परतला. त्याने आपल्या खेळीमध्ये 6 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच साई सुदर्शनने 19 चेंडूत 33 धावा केल्या तर राहुल तेवतियाने 8 चेंडूत 23 नाबाद धावा केल्या आहेत.

News Title : GT vs PBKS Highlights

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर

सख्ख्यांनी साथ सोडली, मात्र कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती अजित पवारांच्या मदतीला धावून आली!

मोठी बातमी! ‘या’ बड्या नेत्याने दिला काँग्रेसचा राजीनामा

दिल्लीला ‘ती’ चूक पडली भारी!, ऋषभ पंतसह संघावर मोठी कारवाई