रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर

 Rohit Sharma | देशामध्ये आयपीएल 2024 चा हंगाम सुरू आहे. यंदाची आयपीएल अनेक कारणांनी चर्चेत आली. आयपीएल सुरू होण्याआधी रोहित शर्माला (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यात आलं. त्याची जागा हार्दिक पांड्याला देण्यात आली. यामुळे रोहितचे चाहते संतापले आहे. हार्दिक पांड्याला देखील ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या ड्रेसिंगरूममधील वातावरण पहिल्यासारखं राहिलं नसल्याची चर्चा आहे. पांड्याच्या नेतृत्वामध्ये संघ बॅकफूटवर जात आहे. यामुळे आता रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

रोहित शर्मा संघ सोडण्याच्या तयारीत?

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्स बॅकफूटवर आहे. तिन्ही सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे आता रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स संघ सोडण्याच्या तयारीत आहे. यंदाची आय़पीएल 2024 हंगाम संपल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

रोहित शर्माने 2011 पासून मुंबई इंडियन्स संघामध्ये खेळायला सुरूवात केली. रोहितला 9.2 कोटींने मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यामध्ये घेतलं होतं. त्याने आयपीएलच्या 201 सामन्यांमध्ये 5110 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने आपल्या नेतृत्वाखाली तब्बल पाच जेतेपदं मिळवलीत. रोहितला संघाच्या कर्णधारपादावरून काढल्यानंतर आज संघाची दैनी अवस्था असल्याचं रोहितचे फॅन्स दावा करत आहेत.

हार्दिक आणि रोहित यांचं एकमत नाही?

मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना हा गुजरात टायटन्सविरोधात नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. त्यावेळी हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावेळी त्या दोघांमध्ये खेळाप्रती एकमत होत नसल्याने त्याचा परिणाम हा संघाच्या कामगिरीवर होतोय.

हार्दिकने अनेकदा रोहित शर्मासोबत संवाद साधला परंतू त्या दोघांमध्ये पहिल्यासारखं बाँडिंग पाहायला मिळालं नाही. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरून क्रिकेट चाहते संतापले आहेत. पण पांड्याच्या नेतृत्वामध्ये तीन सामन्यांमध्ये पराभव झाल्याने ते पांड्याला ट्रोल करतात.

News Title – Rohit Sharma IPL 2024 After than Exite From Mumbai Indians

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीला ‘ती’ चूक पडली भारी!, ऋषभ पंतसह संघावर मोठी कारवाई

“मला हे जाणवलंय की…”; लग्नानंतर तापसी पन्नूचा सर्वात मोठा खुलासा!

पवारांचा मोठा गेम; बीडमधून पंकजा मुंडे विरुद्ध ‘या’ नेत्याला उमेदवारी

मोठी बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभेच्या रिंगणात

आता ‘या’ शहराचंही नाव बदलणार?; मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी