सख्ख्यांनी साथ सोडली, मात्र कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती अजित पवारांच्या मदतीला धावून आली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अनेकांचं लक्ष लोकसभा निवडणुकीकडं लागलं आहे. राज्यातील बारामती लोकसभा (Baramati Lok sabha) मतदारसंघात दररोज नवीन ट्वीस्ट निर्माण होत आहेत. काल-परवा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. तर बारामती लोकसभा (Baramati Lok sabha) मतदारसंघात सुप्रिया सुळेंबरोबर सारं पवार कुटुंब प्रचारासाठी उतरलं आहे. अजित पवार यांना एकटं पाडलं जात असल्याच्या चर्चा आहेत.

काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कुटुंबातून एकटं पाडलं जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता पवार कुटुंबातील एक असं सदस्य आहे. त्यांनी अजित पवार यांना जवळ केलं असून अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी त्यांनी आपल्या दारावर लावली आहे.

शरद पवारांचा सावत्र भाऊ अजित पवारांच्या बाजूनं

शरद पवार यांचे थोरले सावत्र भाऊ पांडुरंग पवार हे अजित पवार यांच्या बाजूनं आहेत. अजित पवार यांना एकटं पाडणार नसल्याचं शरद पवार यांच्या थोरल्या सावत्र भावाने माध्यमांशी बोलताना म्हटलंय. पांडुरंग पवार असं त्यांचं नाव असून ते काटेवाडीत राहतात. (Baramati Lok sabha)

घरावर लावला बोर्ड

पांडुरंग पवार यांनी आपल्या काटेवाडीच्या घरावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा बोर्ड लावला आहे. त्या बोर्डवर “दादा-वहिनी हेच आमचं कुटुंब”, अशा आशयाचा बोर्ड लावण्यात आला आहे. त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना साथ दिली आहे. (Baramati Lok sabha)

काही दिवसांपासून अजित पवार यांच्याविरोधामध्ये त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी टीका केली होती. तसेच अजित पवार यांच्याविरोधामध्ये गेली अनेक दिवस पवार कुटुंब बारामती लोकसभा मतादरसंघामध्ये जात प्रचार करत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि बहिण सई पवार यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारास आपली उपस्थिती दाखवली होती.

मात्र आता पांडुरंग पवार हे अजित पवार यांच्या बाजूनं लढणार आहेत. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आता माझं वय 76 वर्षे झाले आहे. पण मी लहानपणापासून अजित पवार यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांचं आमच्यावर प्रेम आहे. आमचंही त्यांच्यावर प्रेम आहे”, असं ते म्हणालेत.

News Title – Baramati Lok sabha In Sharad Pawar Brother Support to Ajit pawar

महत्त्वाच्या बातम्या

धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा