माढ्यात वाढला तिढा!, शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dhairyasheel Mohite Patil | भाजपमध्ये सध्या उमेदवारीवरून नेत्यांच्या नाराजीचं सत्र सुरू आहे. भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट सत्तेत सामील झाल्याने जागावाटप संदर्भात यांच्यात अजूनही चर्चा सुरू आहेत. त्यातच रोज एखादा तरी नेता उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत आहे. याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर असताना नाराज नेत्यांची मनधरणी करण्यातच पक्षाचा वेळ जात आहे. अशात माढ्यातून एक नाराज नेता पक्षाला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने माढ्यातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबईत रात्री शरद पवारांची भेट घेतल्याने एकच चर्चा रंगल्या आहेत.

धैर्यशील मोहिते पाटील पवारांच्या भेटीला

पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या या भेटीत धैर्यशील पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे शरद पवार गटात जाणार असल्याचं म्हटलं जातंय. शरद पवार गटात प्रवेश झाल्यास ते माढ्यातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा आहे.

मोहिते पाटील हे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवार गटात जाणार असल्याचं म्हटलं जातंय. तसंच रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांनाच त्यांच्या विरोधात कसं उतरवता येईल, याचीही चाचपणी सध्या पवार गटाकडून सुरू असल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीमध्ये माढा मतदारसंघात उमेदवार देण्याची जबाबदारी पवार गटाकडे अली आहे. त्यामुळे पवार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देऊ शकतात.

माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने नाराजी

भाजप श्रेष्ठींकडून मात्र, धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या बंडखोरीकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातंय. कारण, माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, फलटण आणि माण-खटाव हे तालुके येतात. या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार असल्याने मोहिते पाटलांनी बंडखोरी केली, तरी रणजितसिंह निंबाळकर यांना फारसा फरक पडणार नसल्याचं चित्र आहे.

भाजपने जरी दुर्लक्ष केलं तरी मोहिते पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या गुढी पाडव्याला मोहिते पाटील भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आता मोहिते पाटलांबाबत पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

News Title-Dhairyasheel Mohite Patil likely to join Sharad Pawar group  

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

या राशींच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादात पडू नका

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला दिला घरचा आहेर; गिलची खेळी ठरली व्यर्थ

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर