राज्यात उष्णतेच्या लाटेसह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. हवामान विभागाने येत्या तीन दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. तर, काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता आहे. विदर्भमधील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर दुपारून शकतो पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हवेची एक द्रोणीय रेषा दक्षिण तामिळनाडू ते आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. ही द्रोणीय रेषा विदर्भावरून जाते. तसंच अरबी समुद्रावर एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. यामुळे वातावरणात बदल होत आहेत. राज्याच्या संपूर्ण भागामध्ये पुढील 24 तासात हवामान कोरडं राहील.

‘या’ भागांत अवकाळी पावसाचा इशारा

त्यानंतर 6 ते 8 एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भामध्ये 7 व 8 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तत्पूर्वी आज 5 एप्रिल आणि उद्या 6 एप्रिल रात्री उकाडा जाणवेल.

तर नाशिक, अहमदनगर , सोलापूर , जालना, बीड , नांदेड , लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 6 एप्रिलनंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Maharashtra Weather Update ) तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ भागांत उष्णतेची लाट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अकोला, चंद्रपुर, यवतमाळ येथे पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येईल. तर मुंबई, रायगड, ठाणे, आणि पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, यवतमाळ, मालेगाव, सोलापूर जिल्ह्यात (Maharashtra Weather Update ) सर्वाधिक तपमानची नोंद झाली आहे.

News Title : Maharashtra Weather Update Heat wave and rain warning

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

या राशींच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादात पडू नका

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला दिला घरचा आहेर; गिलची खेळी ठरली व्यर्थ

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर