लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

Pooja Bhatt | एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी एका विशिष्ट वयाच्या टप्प्यात येतात तेव्हा नातेवाईक लग्नाबाबत प्रश्न करत असतात. लग्न करावं की करू नये? हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये लग्नाचा प्रश्न हा सार्वजनिक स्तरावर मांडला जातो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण लहान असताना नातेवाईक आपल्याला खाऊ आणायचे. आता आपलेच नातेवाईक लग्नाचं कसं काय मग? असा प्रश्न विचारतात. अशाच प्रश्नांचा सामना पूजा भट्टला (Pooja Bhatt) करावा लागत आहे.

मध्यमवर्गीय मुलगी असो व् श्रीमंत मुलगा. अनेकांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. अनेकजण म्हणतात की एखाद्या मुलाची/मुलीची आम्ही ओळख करून देतो. बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची बहिण पूजा भट्ट हीला देखील या लग्नाच्या प्रश्नावरून नातेवाईक सुट्टी देत नाहीत. पूजा भट्टचं (Pooja Bhatt) वय वर्षे 52 आहे. पूजानं (Pooja Bhatt) एका मुलाखतीमध्ये लग्नावरून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाली पूजा?

“लग्नावरून मला अनेकदा विचारलं जातं की मी लग्न का केलं नाही? तु इतकी छान आहेस? एखाद्या मुलाशी ओळख करून देतो? माझ्याजवळ अनेक लोकं येतात आणि म्हणतात की लग्न कर. काय करू लग्न करून?”, असा प्रतिसवाल पूजाने आपल्या मुलाखतीतून केला आहे.

“जेव्हा लग्न व्हायचंय तेव्हा होईल. जेव्हा एखादी व्यक्ती भेटायची तेव्हा भेटेल, एक पुरूष प्रत्येक गोष्टीचं समाधान असू शकत नाही. आपण स्वत:ला सावरलं पाहिजे. एक लाईफ पार्टनर शोधण्यापेक्षा उत्तम कॅम्पॅनिअन शोधावा. असा एखादा माझ्यासाठी कॅम्पॅनिअन भेटला तर मी त्यांच्यासोबत राहिल”, असं पूजा भट्ट म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja B (@poojab1972)


“एखादी व्यक्ती जरी नाही भेटली तरीही मी माझ्या कुटुंबासोबत, वडिल, मैत्रिणी, माझं सुरू असलेलं काम यामुळे माझं आयुष्य सुंदर आहे. मी सिंगल असल्याने माझं आयुष्य कधीही अपूर्ण राहिलं नाही,” असं पूजा भट्ट म्हणाली.

News title – Pooja Bhatt When will you get married?

महत्त्वाच्या बातम्या

दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता!

चाणक्यांचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा; मानसिक तणावातून मिळेल मुक्ती

चुकून खरेदी केलेल्या खेळाडूनं सामना जिंकवला, प्रिती झिंटानं केलं असं काही की…

“श्रीकांत शिंदे अजून बच्चा”, संजय राऊतांची तोफ धडाडली

‘ॲनिमल’मधील ‘त्या’ सीनबाबत अखेर रश्मिकाने सोडलं मौन, म्हणाली…