दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता!

Jalgaon News | लोकसभा निवडणुकीआधी राज्यामध्ये राजकीय नाट्य घडत आहेत. जळगावमध्ये (Jalgaon News) राजकीय भूकंप होण्याची चिन्हं आहेत. बंद दाराआड तास न् तास चर्चा सुरू आहे. भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपमधून काही नगरसेवक हे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. यासाठी आता भाजप नेते संकटमोचक गिरीश महाजन यांनी बैठक घेण्यासाठी सुरूवात केली आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजपचे नगरसेवक फुटणार?

अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय नाट्य घडताना दिसतंय. जळगावमध्ये (Jalgaon News) भाजपचं टेन्शन वाढलं आहे. नुकतेच भाजपचे नेते उन्मेश पाटील यांनी शिवबंधन बांधून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपच्या डोकेदुखीत आणखी वाढ होऊ लागली आहे. यामुळे आता गिरीश महाजन यांनी बैठक घेत आपल्या नगरवसेवकांना बोलवून बैठक घेतली आणि त्यांना तंबी दिल्याची माहिती समोर आली.

विद्यमान खासदार ठाकरे गटामध्ये आल्यानंतर भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होताना दिसत आहे. जळगावात (Jalgaon News) ठाकरे गटाकडून भाजपची कोंडी होताना दिसणार आहे. ठाकरे गट भाजपचे नगरसेवक फोडणार असल्याची माहिती दिली आहे. (Jalgaon News)

बंद दाराआड चर्चा

ठाकरे गटाच्या लोकप्रतिनीधीवर 30 हून अधिक नगरसेवक फोडण्याचं काम देण्यात आलंय. यामुळे जळगावमध्ये भाजप अडचणीत आहे. ठाकरे गट पक्ष फोडणार असल्याची बातमी फूटल्याने गिरीश महाजन यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक बोलावली. त्यावेळी नगरसेवकांना पक्ष न सोडून जाण्याची तंबी गिरीश महाजन यांनी दिली आहे.

प्रत्येक नगरसेवकाला मतांचं टार्गेट देण्यात आलं आहे. जर मताधिक्य दिल्यास महानगरपालिकेसाठी विचार केला जाईल. नाही तर नाही. त्यामुळे तुम्हाला मताधिक्य द्यावचं लागणार असल्याचं गिरीश महाजन यांनी बंद दाराआड नगरसेवकांशी बातचीत केली आणि त्यांना सुनावलं.

News Title – Jalgaon News About BJP Will Joined Shivsena Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

“श्रीकांत शिंदे अजून बच्चा”, संजय राऊतांची तोफ धडाडली

‘ॲनिमल’मधील ‘त्या’ सीनबाबत अखेर रश्मिकाने सोडलं मौन, म्हणाली…

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

सोन्याचे भाव गगनाला, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर

पुन्हा कॅप्टन होशील का?, नीता अंबानींची ॲाफर, मात्र रोहितनं दिलं सडेतोड उत्तर?