सोन्याचे भाव गगनाला, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today | एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीचे भाव रॉकेटच्या तेजीने वाढत आहेत. या महिन्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून किमती वाढत गेल्या. त्यामुळे सराफ मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी एकदमच कमी झाली आहे. या दरवाढीमुळे आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड तुटले.

सोने या चार दिवसांत तब्बल 2300 रुपयांनी तर चांदीने 4,000 रुपयांनी वाढले. देशातील सुवर्णपेठ जळगावमध्ये तर सोनं जीएसटीसह 72,000 रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. मौल्यवान धातूच्या किमती वाढतच चालल्या आहेत.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 एप्रिल रोजी सोन्याने 930 रुपयांची भरारी घेतली. 2 एप्रिल रोजी त्यात 250 रुपयांची घसरण झाली. 3 एप्रिलला सोने 750 रुपयांनी वधारले. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांनी दर वाढले. आज (5 एप्रिल) पुन्हा याचे भाव गगनाला भिडले आहेत.

आजचे सोने-चांदीचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 64,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचे (Gold-Silver Rate Today)भाव देखील सध्या तेजीत आहेत.

2 एप्रिलला चांदीत 400 रुपयांची वाढ झाली. 3 एप्रिलला त्यात तब्बल 2 हजारांची वाढ झाली. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी किंमती उसळल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 82,000 रुपये मोजावे लागणार आहेत. किमती सतत वाढत असल्याने ग्राहक सराफा मार्केटपासून पाठ फिरवत आहेत.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

गुडरिटर्न्सनुसार (Gold-Silver Rate Today) 24 कॅरेट सोने 69,364 रुपये, 23 कॅरेट 69,086 रुपये, 22 कॅरेट सोने 63,537 रुपये झाले.18 कॅरेट 52,023 रुपये, 14 कॅरेट सोने 40,578 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

News Title- Gold-Silver Rate Today April 5

महत्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

या राशींच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादात पडू नका

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला दिला घरचा आहेर; गिलची खेळी ठरली व्यर्थ

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर