पुन्हा कॅप्टन होशील का?, नीता अंबानींची ॲाफर, मात्र रोहितनं दिलं सडेतोड उत्तर?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | देशामध्ये आयपीएलचं वारं वाहत आहे. आयपीएल 2024 चा हंगाम सुरू असताना अनेक घटना घडत आहेत. यंदा आयपीएल सुरू होण्याआधी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं. यावरून चाहते संतापले. अनेकांनी मुंबई इंडियन्स संघाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अनफॉलो केलं. आयपीएल सुरू झाली मुंबईचे चाहते नाराज होते. मात्र संघ चांगल्या परिस्थितीमध्ये खेळ दाखवेल अशी आशा होती. मात्र पांड्याच्या नेतृत्वामध्ये होत्याचं नव्हतं झालं. यामुळे आता रोहितला (Rohit Sharma) नीता अंबानी यांनी कर्णधार होण्याबाबत ऑफर दिल्याची माहिती समोर आली.

रोहितला पुन्हा कर्णधारपदासाठी ऑफर

मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याला दिल्यानंतर संघ बॅकफूटवर गेला आहे. तिन्ही सामन्यांमध्ये होत्याचं नव्हतं होऊन बसलं. तिन्ही सामन्यांमध्ये पांड्याच्या नेतृत्वामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर आता नीता आंबानीने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होण्याबाबत ऑफर दिल्याची चर्चा आहे. यावर रोहित शर्माने (Rohit Sharma) सडेतोड उत्तर दिलं.

रोहितचं सडेतोड उत्तर

माध्यमांच्या वृत्तानुसार रोहित शर्माला (Rohit Sharma) नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची ऑफर दिली. त्यावर रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार न होण्याचं उत्तर दिलं आहे. यासोबत रोहितबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. रोहित शर्मा आय़पीएल 2024 संपल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. आय़पीएल 2025 मध्ये तो दुसऱ्या संघातून खेळणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्स संघ खेळत होता. त्यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये संघाने तब्बल पाच जेतेपदं मिळवली आहे. मात्र रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतल्यानं रोहितच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया म्हणू नका की स्टेडियम. रोहितचे चाहते वेगवेगळ्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करतात.

आयपीएल 2024 सुरू झाल्यापासून रोहितचे चाहते पांड्याला ट्रोल करत आहेत. पांड्या मैदानात आला की त्याला डिवचत आहेत. मुंबई इंडियन्सने पांड्याला कर्णधार पदाची धुरा सांभाळायला दिल्याने संघाने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं संघाच्या मॅनेजमेंट टीमला वाटत असेल.

News Title – Rohit Sharma Captaincy Offer By Nita Ambani

महत्त्वाच्या बातम्या

माढ्यात वाढला तिढा!, शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘एडवेंचर ट्रीप’ प्लॅन करताय?; इथे मिळेल बेस्ट पॅकेज तेही बजेटमध्ये

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राडा!, उदय सामंतांनी वाढवलं राणेंचं टेन्शन

चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

या राशींच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादात पडू नका