IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) हंगाम सुरू आहे. यंदाच्या आय़पीएलमध्ये (IPL 2024) अनेक ट्विस्ट घडत आहेत. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सनं सुरूवातीला कर्णधारपद दिलं. यानंतर संघामध्ये दोन गट पडले आहेत. रोहित शर्माच्या बाजूनं मुंबई इंडियन्स संघाचे अधिक चाहते आहेत. तर हार्दिक पांड्याला ट्रोलर्सला सामोरं जावं लागत आहे.
मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आय़पीएल हंगामामध्ये (IPL 2024) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे हार्दिकला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्स संघामध्ये फूट पडल्याचं जाणवतंय. मात्र आता हार्दिक पांड्याचं वाढत चाललेलं टेन्शन कमी करण्यासाठी मुंबईचा मास्टर 360 पुन्हा येत आहे. (IPL 2024)
गेम चेंजर सूर्याचं पुन्हा कमबॅक?
मुंबईमध्ये गेम चेंजर सूर्यकुमार याची वापसी होणार असल्याची चर्चा आहे. त्याला त्याच्या फिटनेसवरून विश्रांती देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार असल्याची चर्चा आहे. सूर्या हा 5 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स संघामध्ये येणार असल्याची माहिती आहे.
🚨🚨Suryakumar Yadav is set to link up with the Mumbai Indians squad on April 5
Details: https://t.co/dWczlJNHVe#MIvDC #IPL2024 pic.twitter.com/a8XCjNHDcM
— Cricbuzz (@cricbuzz) April 4, 2024
7 एप्रिल रोजी मुंबई विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे. यासाठी तो खेळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. हा सामना होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यामुळे सूर्या आपल्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर खेळणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.
सूर्याच्या कमबॅकने हार्दिक पांड्याचं टेन्शन हलकं होणार आहे. सध्या पांड्याच्या नेतृत्वामध्ये संघाला पराभवाच्या हॅटट्रिकचा सामना करावा लागला. मात्र सूर्याने जर कमबॅक केलं तर संघामध्ये नेमका काय परिणाम होईल हे पाहणं गरजेचं आहे.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
News Title – IPL 2024 Mumbai Indians Team In Suryakumar Yadav Will Comeback
महत्त्वाच्या बातम्या
पवारांचा मोठा गेम; बीडमधून पंकजा मुंडे विरुद्ध ‘या’ नेत्याला उमेदवारी
मोठी बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभेच्या रिंगणात
आता ‘या’ शहराचंही नाव बदलणार?; मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी