Weather Update | पुण्यासह राज्यामध्ये येत्या 15 दिवसांमध्ये उष्णतेची लाट पसरणार आहे. यामुळे आगामी 15 दिवस हे राज्यातील लोकांसाठी फार महत्त्वाचे आहेत. पुण्यासह राज्यातील नाशिक, जळगावमध्येही उन्हाचा चटका पुढील 15 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेमध्ये वाढ होताना दिसते. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. (Weather Update )
केवळ दिवसाच नाही तर रात्री देखील उन्हाच्या झळा राज्यातील लोकांना अनुभवायला मिळतायत. गेल्या दोन दिवसांमध्ये विदर्भामध्ये 42 तर मराठवाड्यामध्ये 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. पुणे, नाशिक आणि जळगाव येथे तापमान हे चाळीशी पार होताना दिसतेय.
दुपारी घरातून बाहेर पडू नका असं हवामान खातं सांगत आहे. उन्हाळा ऋतूत दुपारच्या वेळी अधिक उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिक करून दुपारी घराच्या बाहेर पडू नका. उष्णतेसह आगामी लोकसभा निवडणूक आहे. अनेक लोकं मतदानासाठी, काही प्रचारासाठी, काही सभांच्या कामांसाठी बाहेर पडतील. त्यांनी उष्णतेपासून काळजी घ्यावी. (Weather Update)
दुपारी 12 ते 3 वेळेत फार महत्त्वाचं काम नसेल तर अजिबात बाहेर पडू नका. प्रत्येकाने स्वत:चे रक्षण करा. असा सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे. तसेच येत्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे असा हवामान खात्यानं (Weather Update )अंदाज वर्तवला आहे.
पुढील आठवड्यात पावसाची शक्यता
उन्हाळा ऋतूमध्ये पावसाची शक्यता आहे. खालच्या थरातील वाऱ्यामुळे पुढील दोन दिवस राज्यामध्ये सर्वत्र कोरडे हवामान राहिल. पुढील पाच दिवस कमाल तापमानात बदल होणार नाही. 5 ते 9 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहिल. तर 8 एप्रिलला मराठवाड्यात, 6 ते 9 एप्रिल विदर्भात आणि 9 एप्रिलला कोकण आणि गोव्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी असणार. (Weather Update)
7 एप्रिलला विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विजांचा कडकडाट होणार असून पावसाची शक्यता आहे. पुण्यात सायंकाळच्या सुमारास आकाश ढगाळ राहिल. 9 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहिल आणि पावसाची शक्यता राहिल.
News Title – Weather Update Of Maharashtra News
महत्त्वाच्या बातम्या
54 वर्षांनंतर येणारं सुर्यग्रहण ‘या’ चार राशींसाठी असणार लाभदायक!
CSK चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!
उष्णतेपासून पुणेकरांना दिलासा मिळणार, ‘या’ तारखेला पावसाची शक्यता
नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
“भाजपने एकनाथ शिंदेंना ताटाखालचं मांजर बनवलंय”