काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि 25 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना 1 लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह 30 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.

काँग्रेसची नारी न्याय ‘गॅरेंटी’ काय?

गरीब कुटुंबातून महिलेला वर्षाला 1 लाख रुपये.

केंद्र सरकारच्या नव्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण.

आशा, मिड डे मिल, आंगनवाड़ी वर्कर्सना जास्त वेतन देणार.

प्रत्येक पंचायतीमध्ये एक अधिकार सहेली.

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी डबल हॉस्टेल.

मोदी गॅरंटीवर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेसनेही 25 गॅरंटी दिल्या आहेत. ओपीसीचा वादा, गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये, महिलांना नोकरीत 50 टक्के आरक्षण देण्याची घोषणा जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन फॉर्म्युल्यानुसार एमएसपी कायदा लागू करण्याची गॅरंटी, श्रमिकांसाठी 25 लाखांचा आरोग्य बिमा, मोफत उपचार, डॉक्टर, औषधे, रुग्णालये, टेस्ट, सर्जरीबाबतच्या घोषणाही जाहीरनाम्यातून करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमीन देण्याचं आश्वासनही या घोषणापत्रातून करण्यात आलं आहे.

सत्ता आल्यास 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्यात येईल. तसेच आरक्षणाची मर्यादाही वाढवण्यात येणार असल्याची घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सोन्याचे भाव गगनाला, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर

पुन्हा कॅप्टन होशील का?, नीता अंबानींची ॲाफर, मात्र रोहितनं दिलं सडेतोड उत्तर?

मुंबई इंडियन्सचे चाहते झाले खुश; ‘हा’ खेळाडू MI मध्ये परतणार

उन्हात फिरू नका!; येत्या 15 दिवसात उष्णतेची लाट येणार?, हवामान विभागाचा इशारा

घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ महत्त्वाची बातमी नक्की वाचा!