कुख्यात गँगस्टर अरूण गवळी तुरूंगातून सुटणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arun Gawali | कुख्यात गँगस्टर अरूण गवळी (Arun Gawali) लवकरच तुरूंगातून बाहेर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकेकाळी दाऊद इब्राहिमला मारण्यासाठी अरूण गवळीनं (Arun Gawali) मोठं पाऊल उचललं होतं. आता तोच अरूण गवळी तरूंगातून बाहेर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपाठीने दिले आहेत. 2006 मध्ये अरूण गवळीची शिक्षेतून सुटका व्हावी यासाठी मागणी करण्यात आली होती.

गँगस्टर अरूण गवळीच्या (Arun Gawali) याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने अद्यापही निकाल जाहीर केला नव्हता. मात्र आता कोर्टाने मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत जेल प्रशासनाला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याप्रकरणी सध्या अरूण गवळी (Arun Gawali) हे नागपूर तुरूंगामध्ये आहेत. त्यांना दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

2006 चा शासन निर्णय

65 वय वर्षे असणारी व्यक्ती ही अशक्त आणि निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांच्या सुटकेत सूट मिळते. अरूण गवळीची मुतदपूर्व सुटकेची मागणी केली होती. आता त्यांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

14 वर्षे तुरूंगवास भोगल्यानंतर कैद्याचं वय हे 65 वर्षे असावं. अरूण गवळी आता 69 वयाचे आहेत. ते 2007 पासून जामसांडेकर प्रकरणामुळे तुरूंगात आहेत. आता त्यांना तुरूंगात जाऊन 16 वर्षे झाली. त्यामुळे अरूण गवळींची सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली.

जामसांडेकर प्रकरणाविषयी थोडक्यात

कमलाकर जामसांडेकर आणि त्यांच्याच विभागामध्ये राहणारा व्यक्ती सदाशिव सुर्वे यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होते. सदाशिवने अरूण गवळीला ही सुपारी दिली. आपलं नाव येऊ नये म्हणून अरूण गवळीने प्रताप गोडसेला जबाबदारी दिली. गोडसेनं शूटर्स पाठवले असून त्यामध्ये नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड करण्यात आली. यामध्ये अडीच अडीच लाख रूपये देण्याचं कबूल केलं. त्यावेळी अॅडवान्स 20-20 लाख रूपये दिले. गिरीने जामसांडेकरवर पाळत ठेवली. संधी मिळताच 2 मार्च 2007 रोजी त्याची राहत्या घरी हत्या करण्यात आली.

News Title – Arun Gawali Underworld Don Will Came From Jail Will Soon

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

सोन्याचे भाव गगनाला, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर

पुन्हा कॅप्टन होशील का?, नीता अंबानींची ॲाफर, मात्र रोहितनं दिलं सडेतोड उत्तर?

मुंबई इंडियन्सचे चाहते झाले खुश; ‘हा’ खेळाडू MI मध्ये परतणार

उन्हात फिरू नका!; येत्या 15 दिवसात उष्णतेची लाट येणार?, हवामान विभागाचा इशारा