भरसभेत ‘हा’ नेता ढसाढसा रडला, भाषणादरम्यान मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pappu Yadav | आगामी लोकसभा निवडणुकीमुळे वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत. सध्या जवळपास सर्वच पक्षात नाराजीमुळे नाट्यमय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी न मिळल्याने नेते विरोधी गटातील प्रमुखांच्या भेटी-गाठी घेत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या फक्त निवडणुकीची चर्चा सुरू आहे. अशात बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी पक्षासहित काँग्रेसमध्ये सामील झालेले माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी कालच (4 एप्रिल) बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यांनी दुचाकीवरून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचत अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेत पप्पू यादव यांनी स्टेजवर भाषणादरम्यान मोठा खुलासा केला.

पप्पू यादव पूर्णियामधून लढणार

स्टेजवर बोलत असताना पप्पू यादव (Pappu Yadav) यांना भावना अनावर झाल्या आणि ते ढसाढसाच रडू लागले. त्यांनी नाव न घेता आरजेडीवर निशाणा साधला.’माझी मागील 14 दिवसांपासून छळवणूक होत आहे’, असा आरोपही पप्पू यादव यांनी यावेळी केला. त्यामुळे सध्या पप्पू यादव चर्चेत आहेत. बिहारमध्ये आरजेडीने काँग्रेसची खूप सरी सीट हिसकावली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

‘शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेससोबत राहील. मला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. मी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे. माझी राजकीय हत्या करण्याचा खूप प्रयत्न झाला. पण, पूर्णियाची जनता ही मला जाती-धर्मापेक्षा अधिक मोठी आहे.’, असं अपक्ष लढण्यासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर पप्पू यादव यांनी म्हटलं होतं.

पप्पू यादव यांचा गंभीर आरोप

‘मला ‘इंडिया आघाडी’ मजबूत करायचीये. राहुल गांधी यांना मजबूत करायचं हेच माझं ध्येय आहे. मी केवळ पूर्णियाच्या लोकांसाठी निवडणूक लढत आहेत, कारण येथील जनतेची इच्छा आहे. मी नेहमी पूर्णिया, सीमांचल आणि बिहारमधील लोकांच्या कल्याणासाठी लढत राहील.’ असंही पप्पू यादव म्हणाले.

दरम्यान, पप्पू यादव (Pappu Yadav) यांनी पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यांनी आता अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

News Title : Pappu Yadav cry during speech in purnia

महत्त्वाच्या बातम्या-

“श्रीकांत शिंदे अजून बच्चा”, संजय राऊतांची तोफ धडाडली

‘ॲनिमल’मधील ‘त्या’ सीनबाबत अखेर रश्मिकाने सोडलं मौन, म्हणाली…

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

सोन्याचे भाव गगनाला, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर

पुन्हा कॅप्टन होशील का?, नीता अंबानींची ॲाफर, मात्र रोहितनं दिलं सडेतोड उत्तर?