‘ॲनिमल’मधील ‘त्या’ सीनबाबत अखेर रश्मिकाने सोडलं मौन, म्हणाली…

Rashmika Mandanna | ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून आली. यात अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट जेवढा प्रसिद्ध झाला, त्यावर तितकीच टीकाही झाली.

चित्रपटातील अनेक सीनवरून टीका झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्यावर प्रसिद्ध पटकथा लेखक, गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे हा चित्रपट खूपच चर्चेत राहिला. यामधील करवा चौथच्या सीनवरून अभिनेत्री रश्मिका हीला देखील ट्रोल करण्यात आलं.

रश्मिकाच्या अभिनयकौशल्याची खिल्ली

रश्मिका (Rashmika Mandanna) मुळची साऊथ स्टार असल्याने तिचा हिंदी अॅक्सेंट तितका प्रभावी नव्हता. त्यातच चित्रपटात करवा चौथच्या सीनमध्ये नेमकं ती काय बोलली, हे प्रेक्षकांना समजलंच नाही. यावरून तिला बरंच ट्रोल करण्यात आलं. अखेर या ट्रोलिंगवर रश्मिका मंदानाने मौन सोडलं आहे.

या सीनमध्ये ज्याप्रकारे ती रणबीरवर रागावते आणि त्यानंतर दातओठ चावून डायलॉग म्हणते, त्यावरून अनेकांनी तिच्या अभिनय कौशल्याची खिल्ली उडवली होती. रश्मिकाने नुकतीच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने झालेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

ट्रोलिंगवर रश्मिकाने सोडलं मौन

नेहा धुपियाच्या शोमध्ये रश्मिका (Rashmika Mandanna ) म्हणाली की, ‘करवा चौथचा सीन हा नऊ मिनिटांचा होता. तो सीन शूट करताना सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आवडला होता. नऊ मिनिटांचा सीन शूट केल्यानंतर सेटवर सर्वांनी कौतुक केलं. सीन खूप चांगल्याप्रकारे शूट झाला, असं ते म्हणत होते. पण जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा त्या सीनमधील एका विशिष्ट डायलॉगवरून लोकांनी मला प्रचंड ट्रोल केलं.’

‘यावेळी मी विचार केला की, या सीनवर सेटवरील लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. पण, लोक आता त्यावरून का ट्रोल करत आहेत? मीच स्वत:भोवती कोणता फुगा फुगवून घेतला होता का? लोकांना तो सीन खरंच आवडला नाही का? कारण तुम्ही जे काही शूट केलंय, ते लोकांना माहित नसतं. त्यांनी फक्त तो 10 सेकंदांचा डायलॉग पाहिला आणि त्यावरून टीका करण्यास सुरुवात केली’, असं रश्मिका म्हणाली आहे.

News Title : Rashmika Mandanna response trolling from the scene in Animal

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

या राशींच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादात पडू नका

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला दिला घरचा आहेर; गिलची खेळी ठरली व्यर्थ

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर