चाणक्यांचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा; मानसिक तणावातून मिळेल मुक्ती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे देशातील बुद्धीमान आचार्यांपैकी एक आहेत. त्यांची ख्याती ही केवळ भारत देशापुरती मर्यादीत नसून सातासमुद्रापलिकडे आचार्य चाणक्यांच्या (Chanakya Niti) मार्गदर्शनाचे लोक पालन करतात. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) मानवी मुल्यांच्या जडणघडणीवर मार्गदर्शन करतात. मानवाने समृद्ध होण्यासाठी नेमकं काय करावं? याबाबत आचार्य चाणक्य (Chanakya Niti) मानवाला मार्गदर्शन करतात. मानवाच्या आयुष्यामध्ये सुख दु:ख येतात आणि जातात. मात्र अनेकदा कोणीही ताण-ताणावावर बोलत नाहीत. मात्र आचार्य चाणक्य यांनी मनुष्याला येणाऱ्या ताण-तणावाबाबत भाष्य केलं आहे.

ताण-तणाव हा मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. अनेकांना आपल्या वयानुसार ताण असतो. अगदी लहान मुलांना तो ताणाव जाणवत नसेलही, मात्र कॉलेज, शाळेत शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या पातळीवर ताण जाणवतो. अभ्यासाचा तणाव, शिक्षणाचा तणाव, एका विशिष्ट वयात आल्यानंतर नोकरीचा तणाव, वैवाहिक जीवनातील तणाव अशा अनेक विविध पातळीतून मनुष्याला ताणावाचा सामना करावा लागतो.

श्रीहरिनामाचा जप केल्याने माणसाच्या जीवनातील दु:ख, संकट, रोग, शोक, वेदना, भय इत्यादी दूर होतात. तुम्हालाही तुमच्या जीवनातील मानसिक आणि शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर आचार्य चाणक्य यांचे हे शब्द नक्की लक्षात ठेवा.

दु:ख

दुखामध्ये मानवाचे मानसिक संतुलन बिघडते. यामुळे त्याला मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागतो. एखादी गोष्ट मानवाच्या लक्षातून जात नसेल तर त्यामुळे आणखी त्रास होतो. यामुळे मानसिक ताणाव वाढण्यास फार वेळ लागत नाही, असं आचार्य चाणक्य सांगतात.

संकट

संकट काळामध्ये मानव ताण-तणावामध्ये असतो. संकटकाळामध्ये मानवाच्या आयुष्यामध्ये अनेक वळणं येतात. मग ते संकट कोणतंही असू शकतं. आजारपण य़ेणं, आर्थिक संकट, वैवाहिक संकट अनेक संकटं आपल्या आयुष्यामध्ये येतात. यामुळे मानसिक ताणाव वाढतो.

दु:ख, संकट, रोग, शोक, वेदना, भय या परिस्थितून जाणारी व्यक्ती ही ताण-तणावामध्ये असल्याचं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे. मानवाला कोणत्याही गोष्टींचं भय असू शकतं. तेव्हा त्या भितीपोटी कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याला ताण-तणाव निर्माण होऊ शकतो.

News Title – Chanakya Niti Say About Dippression Reason

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर

सख्ख्यांनी साथ सोडली, मात्र कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती अजित पवारांच्या मदतीला धावून आली!

मोठी बातमी! ‘या’ बड्या नेत्याने दिला काँग्रेसचा राजीनामा

दिल्लीला ‘ती’ चूक पडली भारी!, ऋषभ पंतसह संघावर मोठी कारवाई