चुकून खरेदी केलेल्या खेळाडूनं सामना जिंकवला, प्रिती झिंटानं केलं असं काही की…

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात क्रिकेट रसिक आयपीएलचा आनंद घेत आहेत. सुरूवातीचे काही सामने रंगतदार झाले नाही. मात्र 4 एप्रिलला गुजरात टायटन्स विरूद्ध पंजाब किंग इलेव्हन या दोन्ही संघामध्ये सामना पार पडला. हा सामना हायहोल्टेज झाला असून फलंदाज शशांक हा सर्वांच्या लक्षात राहिला आहे. गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलने 89 धावा करत आपल्या संघाला 199 धावांपर्यंत नेलं.

199 धावांचा पाठलाग करण्यासाठी पंजाब किंग्ज इलेव्हन संघाने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरूवातीला संघाचे फलंदाज तंबूत परतले आहे. मात्र मधल्या फळीमध्ये संघाला शशांक या फलंदाजानं सावरलं. शशांक कालच्या सामन्याचा गेम चेंजर ठरला. शशांकने 29 चेंडूंमध्ये 69 धावा केल्या आहेत. शशांक सिंह हा पंजाब किंग इलेव्हनचा तारणहार ठरला आहे. 6 चौकार आणि 4 षटकार मारत शशांक सिंह हा विजयाचा दावेदार झाला. मात्र आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामाच्या लिलावावेळी याच शशांकला संघात घेतल्याने प्रिती झिंटानं घ्यावं की घेऊ नये यावरून प्रिती झिंटा गोंधळली.

प्रिती झिंटा गोंधळली

आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामातील लिलावामध्ये एक किस्सा घडला होता. पंजाब किंग इलेव्हन संघाचे सर्वेसर्वा प्रिती झिंटा लिलावावेळी खेळाडूची निवड करत होती. त्यावेळी अनकॅप खेळाडू शशांक सिंहवर बोली लावण्यात आली आणि ती जिंकली. मात्र संघाला हा खेळाडू विकत घ्यायचा नव्हता असं लक्षात आलं. यामुळे प्रिती झिंटानं पश्चाताप झाला. त्यावेळी लिलाव करताना शंशाक नावाचे दोन खेळाडू होते. यामुळे प्रिती झिंटाचा मोठा गोंधळ उडाला.

“गोंधळ झाल्याप्रकरणी पंजाब किंग्ज इलेव्हन संघाच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली. शशांक सिंहवर आमची नजर होती. लिलावामध्ये एकाच नावाचे दोन खेळाडू असल्याने गोंधळ निर्माण झाला. योग्य शशांकची निवड करण्यात आली.” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. (IPL 2024)

अवघ्या 20 लाखात केली खरेदी

शशांकची निवड पंजाब किंग्ज इलेव्हन संघाने केली. केवळ 20 लाख बेस प्राइजमध्ये त्याचा लिलाव करण्यात आला. तसेच इतर कोणत्याही संघाने त्याला बोली न लावल्याने शशांकला पंजाब किंग्ज इलेव्हान संघामध्ये खेळवण्यात आलं.

News Title – IPL 2024 In Preity Zinta Confuse About Shashank Singh

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्सचे चाहते झाले खुश; ‘हा’ खेळाडू MI मध्ये परतणार

उन्हात फिरू नका!; येत्या 15 दिवसात उष्णतेची लाट येणार?, हवामान विभागाचा इशारा

घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ महत्त्वाची बातमी नक्की वाचा!

राज्यात उष्णतेच्या लाटेसह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा!

माढ्यात वाढला तिढा!, शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत