सलग पराभवानंतर हार्दिक पांड्या पोहोचला महादेवाच्या चरणी; मंदिरात केली पूजा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians | रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला (Mumbai Indians) मुंबईचं कप्तान केल्यानंतर सोशल मीडियावरुन पांड्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आली. नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलं. तसेच पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला आयपीएलच्या 2024 च्या हंगामात म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सला सलग तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

हार्दिक पांड्या पोहोचला महादेवाच्या चरणी

मुंबई इंडियन्सची तिसरी मॅच राजस्थान रॉयल्स विरुद्ध 1 एप्रिल रोजी झाली होती. त्या मॅचमध्ये मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर मुंबईची मॅच थेट 7 एप्रिलला होणार आहे. या दरम्यानच्या काळात मुंबईची टीम जामनगरला ट्रीपला गेली असल्याचं समोर आलं होतं. या दरम्यान हार्दिक पांड्या (Mumbai Indians) सोमनाथ मंदिरात दाखल झाला आणि त्यानं मंदिरात पूजा केली.

मुंबई इंडियन्सची पुढील मॅच रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत 7 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. या मॅचपूर्वी हार्दिक पांड्या सोमनाथ मंदिरात दाखल झाला आणि त्यानं पूजा केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Mumbai Indians ची टीम गेली ट्रीपवर

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचनंतर पुढच्या मॅचसाठी सहा दिवसांचा कालावधी होता. या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्सची टीम ट्रीपसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सनं इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईनं शेअर केलेल्या व्हिडीओत कॅप्टन हार्दिक पांड्या, रोहित शर्मासह इतर खेळाडू ट्रीपसाठी जामनगरला गेले असल्याचं समोर आलं आहे. ट्रीपवर असताना ते खूप आनंद लुटत असल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई संघाच्या पुढील कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. मुंबईचा चौथा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

फडणवीसांनी इंदापुरात पाऊल टाकताच चक्रं फिरली; ‘त्या’ भेटीमुळे चर्चांना उधाण

भरसभेत ‘हा’ नेता ढसाढसा रडला, भाषणादरम्यान मोठा खुलासा

कुख्यात गँगस्टर अरूण गवळी तुरूंगातून सुटणार!

दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता!

चाणक्यांचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा; मानसिक तणावातून मिळेल मुक्ती