मनोज जरांगे पाटलांचं एक पाऊल पुढे; केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेण्याबाबत सरकारकडे मागणी केली आहे. मात्र सरकार मागणी मान्य करत नसल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवणार?

सरकारवर टीका करताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा बांधवांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. “आपल्याला आरक्षण दिलं तर ठिक. आपल्याला निवडणुकीबद्दल काही घेणं देणं नाही,” असं बीडच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं आहे.

“ही निवडणूक सागरासारखी आहे. ती आपल्या टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये त्यांना हिसका दाखवा. सर्वांनी मतदान करा. त्यांना बटण सापडलं नाही पाहीजे. जवळपास 92 मतदारसंघामध्ये मराठ्याचं वर्चस्व आहे. सगळ्या जाती धर्माचे लोकं एकत्र आहेत. 160 उमेदवार आपलेच आहेत. जर आरक्षण मिळालं तर आपल्याला निवडणुकीचं काही देणघेणं नाही. तर तयारीला लागा,” असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

”तर राजकारणात यावं लागेल”

नेत्याचा जीव हा निवडणुकीमध्ये आहे. त्यामुळे त्यांना हिसका दाखवा. आधी आपल्याला राजकारण कळत नव्हतं पण आपल्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकारण कळू लागलं आहे. त्यामुळे यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवा. त्यांनी सगेसोयरेची अंमलबजावणी करावी. आपला राजकारणाशी काहीही संबंध नाही. पण सरकार मागणी पूर्ण करत नसेल तर राजकारणात यावं लागेल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“यावेळी मराठ्यांनी 100 टक्के मतदान केलं पाहिजे. ईव्हिएम मशीनचं बटन खाली गेलं पाहिजे, इतक्या प्रमाणात मतदान करा”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News title – Manoj Jarange Patil Will Enter In Politics

महत्त्वाच्या बातम्या

सलग पराभवानंतर हार्दिक पांड्या पोहोचला महादेवाच्या चरणी; मंदिरात केली पूजा

फडणवीसांनी इंदापुरात पाऊल टाकताच चक्रं फिरली; ‘त्या’ भेटीमुळे चर्चांना उधाण

भरसभेत ‘हा’ नेता ढसाढसा रडला, भाषणादरम्यान मोठा खुलासा

कुख्यात गँगस्टर अरूण गवळी तुरूंगातून सुटणार!

दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता!