प्रीति झिंटा पंजाबच्या ‘या’ खेळाडूच्या पडलीय प्रेमात, खास पोस्ट करुन म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 चे सामने सध्या सुरू आहेत. 4 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाबच्या एका खेळाडूने चमक दाखवली. हा खेळाडू म्हणजे शशांक सिंह. पंजाब संघाने शशांक सिंह याला चुकून संघात घेतलं होतं. आयपीएल ऑक्शनदरम्यान प्रीती झिंटा हीने चुकून अनकॅप्ड खेळाडू शशांक सिंह याला खरेदी केलं होतं. यावरून नंतर बराच वाद झाला. मात्र, शशांकने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करत संघासाठी विजयी कामगिरी केली.

शशांक सिंह याच्या शानदार खेळीनंतर सोशल मीडियावर पंजाब संघाला आणि प्रितीला ट्रोल करण्यात आले.शशांक सिंह याला चुकून घेण्यात आलं, असा टोला नेटकऱ्यांकडून लगावण्यात आला. आता याच ट्रोलर्सला प्रिती झिंटानं प्रत्युत्तर दिलं आहे. शशांक सिंह याच्या सपोर्टमध्ये प्रिती झिंटाने एक पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

प्रिती झिंटाची पोस्ट

प्रितीने एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) शशांकसाठी खास पोस्ट केली. त्यात ती म्हणते की, ‘आयपीएल लिलावात आमच्याबद्दल जे काही बोललं जात होतं, त्याबद्दल बोलण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मला वाटतेय. शशांक याला चुकून खरेदी केलं, असं ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी अनेकांचा आत्मविश्वास गमावलेला असतो. दबावाखाली जातात, किंवा निराश होतात. पण शशांकने त्यावर मात केली. तो इतरांसारखा नाही. तो खरोखरच खूप खास आहे.’

‘फक्त एक खेळाडू आणि कौशल्यामुळे नाही तर त्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे. शशांकने त्याच्यावरील टीका-टिप्पण्या, ट्रोलिंग, आरोप, विनोद या सर्वांना सहजपणं घेतलं. तो बळीचा बकरा झाला नाही. त्यानं स्वत:वर विश्वास दाखवला.’, असं प्रितीने पोस्टमध्ये (IPL 2024 ) म्हटलं.

प्रितीकडून शशांकचे कौतुक

पुढे ती म्हणते की, “शशांक सिंह यानं स्वत:चं समर्थन केलंच, त्याशिवाय मेहनतही करत सर्वांना आपल्या प्रतिभेची चूणूक दाखवली. त्यामुळेच मी त्याचं कौतुक करत आहे. शंशाक याच्या खेळीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तो सन्मनाचा पात्र आहे. आयुष्य जेव्हा नव्या वळणावर जातं, तेव्हा तुमच्या स्क्रिप्टनुसार चालत नाही, हे सर्वांसाठी एक उदाहरणच आहे. कारण, लोक तुमच्याबाबात काय विचार करतात, ते महत्वाचं नाही. पण तुम्ही तुमच्याबाबत काय विचार करतात, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शशांकप्रमाणेच स्वत:वर विश्वास करणं बंद करु नये. शशांक आयुष्याच्या खेळात तू नक्कीच सामनावीर होशील, अशी मला आशा आहे.”

दरम्यान, गुजरातने पंजाबला विजयासाठी (IPL 2024 ) 200 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबकडून शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, जितेश शर्मा, सिकंदर रजा यासारखे खेळाडू बाद होऊन तंबूत परतले होते. तेव्हा शशांकने 29 चेंडूमध्ये नाबाद 61 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

News Title- IPL 2024 Preity Zinta Special post for Shashank Singh

महत्त्वाच्या बातम्या –

पैसे मोजताना ‘ही’ चूक करत असाल तर थांबा, अन्यथा…

‘रामायण’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

शरद पवार गटाचा ‘हा’ उमेदवार संकटात; उमदेवारी जाहीर होताच मोठी कारवाई

मनोज जरांगे पाटलांचं एक पाऊल पुढे; केली ‘ही’ मोठी घोषणा