अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sambhajinagar | लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तशी राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण होताना दिसतेय. नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजित पवार गटाकडून एका शिक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार संभाजीनगर (Sambhajinagar) येथे घडला असल्याची माहिती समोर आलीये. प्रवीण वाघ असं त्या शिक्षकाचं नाव असून त्या शिक्षकावर शाळेच्या आवारातच जोरदार हल्ला केला.

शिक्षकाला जिवंत मारण्याचा कट

संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) शिक्षक प्रवीण वाघ यांना मारहाण केली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी शिक्षकाला मारहाणीबाबत धमकी दिली. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सचिन मिसाळ, अखिल भारतील छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रमेश गायकवाड आणि गजानन पवार यांनी प्रवीण वाघ यांना जिवंत मारण्याचा कट रचला.

याआधी याच गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी विनोद पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधून (Sambhajinagar) लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गरीब मराठ्यांना मारहाण केली. त्यानंतर आठवड्यामध्ये दोनदा मारहाण करण्यात आली. त्यांची गुंडप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे सचिन मिसाळला मंत्री छगन भुजबळ यांनी 10 लाख रूपयांची सुपारी देऊन सभा उधळून टाकण्याबाबत सांगितलं, असा दावा मराठा कार्यकर्त्यांनी त्यावेळी केला.

अजित पवार गटाच्या नेत्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तरीही पोलीस तक्रार नोंदवत नाहीत. पोलिसांवर देखील राजकीय दबाव पाहायला मिळतोय.

नेमकं प्रकरण काय?

एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे शिक्षक प्रवीण वाघ हे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होते. त्यावेळी काही लोकांनी शाळेच्या आवारामध्ये जात प्रवीण वाघ यांना शिवीगाळ केली. जर काही अडचण असेल तर आपण शाळेच्या ऑफिसमध्ये या आपण बसून बोलूया असं सांगितलं. मात्र प्रवीण वाघ यांना दगडाने मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाघ यांच्या कुटुंबियांना गुडांनी जीवंत मारून टाकू अशी धमकी दिली.

News Title – Sambhajinagar In Ajit pawar Leader Attack On School Teacher

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता भाजपात घरवापसी करणार?

गुढीपाडव्याला बनवा स्वादिष्ट आम्रखंड, जाणून घ्या खास रेसिपी

प्रीति झिंटा पंजाबच्या ‘या’ खेळाडूच्या पडलीय प्रेमात, खास पोस्ट करुन म्हणाली…

भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेत मोठी खदखद, एकनाथ शिंदेंच्या बैठकीत हायहोल्टेज ड्रामा

देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्याने मंगलदास बांदल यांना नारळ, वंचितनं केली मोठी घोषणा!