बच्चू कडूंची नवी खेळी; महायुतीला मोठा धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने भाजपवर टीका करत आहेत. नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील मतभेदांमध्ये आणखी वाढ होऊ लागलीये.  सुरूवातीपासूनच बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या नावाला कडाडून विरोध केला होती. तरीही महायुतीने त्यांना उमेदवारी दिली. यामुळे सुरू झालेला वाद वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे.

बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात याआधी बैठक झाली. त्यावेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना ऐकवल्या. मात्र नवनीत राणा यांना अमरावतीची जागा दिल्याने भाजपसोबत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचं सूत जुळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी बच्चू कडू यांनी वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका घेऊ असं सांगितलंय. बच्चू कडू बाहेर पडल्यास महायुतीला धक्का बसू शकतो. अशात बच्चू कडून मोठं पाऊल उचललं आहे. यामुळे महायुतीच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याचं दिसतंय.

बच्चू कडू यांचा काँग्रेसला पाठिंबा

रामटेकचे काँग्रेस उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच नवनीत राणा यांच्याविरोधामध्ये आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचा नेता दिनेश बाबु याला उमेदवारी दिली आहे. यामुळे आता राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील शमलेलं वॉर लोकसभा निवडणुकीआधी पुन्हा पेटलंय.

प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यातील एका आमदाराने अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. तसेच नागपूरमध्ये पक्षाची बैठक 2 एप्रिलला घेण्यात आली. त्यावेळी बच्चू कडू यांचा महायुतीमध्ये सन्मान होत नाही, असं म्हणत त्यांची नाराजी बोलून दाखवली होती.

रामटेक येथील बैठकीमध्ये बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याची माहिती 3 एप्रिल रोजी देण्यात आली. त्यानंतर 4 एप्रिलला बच्चू कडूंच्या परवानगीने महाविकास आघाडीचे रामटेकचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा दिलाय.

News Title – Bachchu Kadu Support to Candidate Of Ramtek Lok Sabha Shyamkumar Barve

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण!

13 वर्षांच्या मुलीच्या प्रसंगावधानाने आनंद महिंद्रा झाले चकित; थेट दिली नोकरीची ऑफर

मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता भाजपात घरवापसी करणार?

गुढीपाडव्याला बनवा स्वादिष्ट आम्रखंड, जाणून घ्या खास रेसिपी

प्रीति झिंटा पंजाबच्या ‘या’ खेळाडूच्या पडलीय प्रेमात, खास पोस्ट करुन म्हणाली…